Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

Chandrayaan-3:
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर तो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (5 ऑगस्ट) सांगितले की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने शुक्रवारी (4 ऑगस्ट) सांगितले होते की, यान चंद्राच्या कक्षेत पोहचण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता पूर्ण होईल.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1687831700452098048?s=20

इस्रोने शुक्रवारी सांगितले की, चांद्रयान-3 अंतराळ यानाने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून चंद्राचे दोन तृतीयांश अंतर कापले आहे. आतापर्यंत चांद्रयान-3 ने पाच वेळा कक्षा पार प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग कधी करणार?
1 ऑगस्ट रोजी यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पोहचण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि यानाला ‘ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी, इस्रोने म्हटले होते की ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 सॉफ्ट लँड करण्याचा प्रयत्न करेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube