चीनची पुन्हा नापाक करतूत, अरुणाचलच्या 11 ठिकाणांची नावं बदलली

चीनची पुन्हा नापाक करतूत, अरुणाचलच्या 11 ठिकाणांची नावं बदलली

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनच्या भारताविरोधात (China Vs India) कुरापती सुरु आहेत. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशाच्या (Arunachal Pradesh) सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत. आतापर्यंत 32 ठिकाणांना चीनी नावं देण्यात आली आहेत. चीनच्या या नापाक करतूतावर भारताने कडक शब्दात टीका केली आहे.

2017 पासून चीनने अरुणाचल प्रदेशातील नावे बदलण्याची तिसरी घटना आहे. आतापर्यंत चीनने 21 ठिकाणांची नावे बदलली होती. पुन्हा चीनने कुरापत करत 11 ठिकाणांची नावे बदलली आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दात टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, चीनने असा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही ते साफ नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहिलं.

Aashish Deshmukh : राहुल गांधीवरील वक्तव्य भोवणार; देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशसाठी 11 ठिकाणांची नावे जारी केली आहेत. चीन या भागाला तिबेटचा दक्षिण भाग झांगनान (Zangnan) असा उल्लेख करत आहे. चीनने ज्या ठिकाणांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्यात अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरजवळील एका जागेचा समावेश आहे.

गेल्या सहा वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. अरुणाचलमधील सहा ठिकाणाच्या प्रमाणित नावांची पहिली यादी 2017 साली जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर 15 ठिकाणांची दुसरी यादी 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube