पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचा मास्टर स्ट्रोक; राज ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी झटक्यात मान्य

Civil Aviation Security revokes security clearance for Celebi Airport Services India Pvt Ltd : भारत आणि पाकिस्तान तणावाच्यावेळी तुर्किने पाकिस्तानला मदत केल्यानंतर संपूर्ण देशभरातून तुर्कस्तानला धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत. तुर्की सफरचंदांपासून ते विविध गोष्टींवर भारतात बहिष्कार टाकण्यात आला आहे. या सर्वांमध्ये राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक मागणी करण्यात आली होती. ही मागणी केंद्र सरकारकडून कोणत्याही विलंबाशिवाय एका झटक्यात मान्य करण्यात आली आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून, आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या (Corporation Election) तोंडावर ठाकरेंना खूश करण्यासाठी केंद्राने मारलेला हा मास्टर स्ट्रोक तर नाही ना? अशी चर्चा आता यामुळे सुरू झाली आहे.
केंद्रानं कोणती मान्य केली मनसेची मागणी?
तुर्कस्तानने पाकिस्तानला केलेल्या मदतीनंतर तुर्कस्तानच्या (Turkey) अनेक गोष्टींवर भारतीयांकडून बहिष्कार टाकला जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंच्या पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी तुर्कस्तानच्या सेलेबी कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द करण्यात आली आहे.
Bureau of Civil Aviation Security revokes security clearance for Celebi Airport Services India Pvt Ltd with immediate effect in the "interest of national security" pic.twitter.com/A4YGBtUQcc
— ANI (@ANI) May 15, 2025
केंद्राच्या सकारात्म निर्णयानंतर मनसेची पोस्ट
केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने केलेल्या या कारवाईनंतर मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आले आहे. ज्यात अदानी समूह ज्या मुंबई एअरपोर्टची व्यवस्था पाहतो तेथे एक सेलेबी नावाची टर्किश कंपनी ग्राउंड हँडलिंगचा काम पाहते भारत सरकारने सदर कंपनी आपल्या ताब्यात घेऊन टर्किश कंपनीला हाकलून द्यावे अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केली होती, त्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत या कंपनीची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे.
अदानी समूह ज्या मुंबई एअरपोर्टची व्यवस्था पाहतो तेथे एक सेलेबी नावाची टर्किश कंपनी ग्राउंड हँडलिंगचा काम पाहते भारत सरकारने सदर कंपनी आपल्या ताब्यात घेऊन टर्किश कंपनीला हाकलून द्यावे अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण यांनी केली होती, त्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र… pic.twitter.com/xFoJzqdS4p
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 16, 2025
पालिका निवडणुकांच्या तोंडावर खूश करण्याचा प्रयत्न
आगामीकाळात मुंबईसह राज्यात विविध महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युतीसाठी भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांकडून वेळोवेळी राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या जात आहेत. मात्र, या भेटी राजकीय नसल्याचे आतापर्यंत सांगितले जात आहे. पण आता केंद्राच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने राज ठाकरेंच्या मनसेकडून सेलेबी कंपनीला हाकलून लावण्याची मागणी तात्काळ मान्य केली आहे. त्यामुळे एकीकडे पालिकानिवडणुकांसाठी मनसेकडून युतीसाठी होकार मिळालेला नसल्याने केंद्राकडून कोणताही विलंब न करता मान्य करण्यात आलेली राज ठाकरेंच्या पक्षाची मागणी एकप्रकारे ठाकरेंना खूश करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाला असून, केंद्राच्या या भूमिकेनंतर आता पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे युतीबाबात काय निर्णय घेतात आणि युती करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण सर्वोपरी
सेलेबीविरुद्ध कारवाईचा हा आदेश बीसीएएसचे सहसंचालक (ऑपरेशन्स) सुनील यादव यांनी जारी केला आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण हे सर्वोपरि आहे आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.
तुर्की की ग्राउंड हैंडलिंग कंपनी CELEBI की सुरक्षा मंजूरी तत्काल प्रभाव से रद्द कर दी है ।
ANI न्यूज एजेंसी से बातचीत…@narendramodi @PMOIndia @AmitShah @RamMNK @MoCA_GoI @Pib_MoCA pic.twitter.com/F7KPVi3QZN
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 15, 2025