पाकिस्तानने कुत्र्यासारखं पायांमध्ये शेपूट घालून युद्धबंदीची भीक मागितली…अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने ‘टेरिरिस्तान’ची केली पोलखोल

US Defense Official Michael Rubin Said Pakistan Beg For Ceasefire : भारत अन् पाकिस्तानमध्ये (India Pakistan Ceasefire) युद्धबंदी झालाय. एकीकडे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबल्याचा बोलबाला सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) भारतावर हल्ले केल्याच्या बढाया मारत आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने (America) ‘टेरिरिस्तान’ची (Michael Rubin) पोलखोल केली आहे.
अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ फेलो मायकेल रुबिन यांनी म्हटलंय की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर (Ind Pak War) दारुण पराभव पत्करावा लागला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. भारताने केलेल्या लष्करी कारवाईचे त्यांनी कौतुक केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या जलद आणि अचूक पद्धतीने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, त्यामुळे जगाचे लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्ककडे वळले. पुन्हा एकदा पाकिस्तानचे खोटेपणा जगासमोर उघड झाला, (Operation Sindoor) असे रुबिन म्हणाले. या संघर्षात भारताने पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिक दोन्ही बाजूंनी पराभूत केले. भारताच्या राजनैतिक विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आता सर्व जगाच्या नजरा पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्यावर केंद्रित आहेत.
ते म्हणाले की, 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील दहशतवादी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने केवळ त्याला प्रत्युत्तर दिले नाही, तर अनेक पाकिस्तानी लष्करी तळ आणि हवाई तळांना लक्ष्य केले.
नोकरी, प्रेम, पैसा… कोणाच्या नशिबात काय? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य
या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आले. या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती. जो युद्धबंदीची याचना करण्यासाठी आपल्या पायांमध्ये शेपूट घालून धावत होता. पाकिस्तान आता हा पराभव कोणत्याही प्रकारे लपवू शकत नाही. त्यांनी पराभव वाईटरित्या स्वीकारला आहे. ही लढाई भारताने सुरू केलेली नाही, तर ती भारतावर लादण्यात आली आहे. प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. भारताने फक्त प्रत्युत्तर दिले, जे पूर्णपणे न्याय्य होते. भारताने स्पष्ट संदेश दिला पाहिजे की, ते सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले कधीही सहन करणार नाही, असं देखील रूबीन यांनी म्हटलंय.
ट्रम्पवर टीका करताना रुबिन म्हणाले की, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिका अनेकदा पडद्यामागे राजनैतिक प्रयत्न करते. जेणेकरून तणाव अणुयुद्धाच्या पातळीपर्यंत पोहोचू नये. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मध्यस्थी’च्या दाव्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘जर तुम्ही ट्रम्पला विचारले तर ते म्हणतील की, त्यांनी एकट्याने विश्वचषक जिंकला. इंटरनेटचा शोध लावला आणि कर्करोगही बरा केला.