Truecaller चा खेळ संपला? फोन वाजताच टेलिकॉम डेटाबेसवर आधारित कॉलर नेम दिसणार ; लागू होणार CNAP सेवा
CNAP Rollout : गेल्या काही दिवसांपासून देशात वाढत असणाऱ्या फेक कॉल्समुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याने आता देशातील
CNAP Rollout : गेल्या काही दिवसांपासून देशात वाढत असणाऱ्या फेक कॉल्समुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याने आता देशातील टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन- आयडिया यांनी देशभरातील विविध भागात कॉलर नेम प्रेझेंटेशन सर्व्हिस सुरु केली आहे. यामुळे कॉलरचे खरे आणि नोंदणीकृत नाव आता तुमचा फोन वाजताच मोबाईल स्क्रीनवर दिसेल. या सर्व्हिसमुळे जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा सिम कार्डच्या अधिकृत केवायसी कागदपत्रांमध्ये नोंदवलेले कॉलरचे खरे नाव तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
सीएनएपी म्हणजे काय ?
सीएनएपी (CNAP) म्हणजे कॉलर नेम प्रेझेंटेशन एक सर्व्हिस आहे. टेलिकॉम कंपन्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ते अंमलात आणत आहेत. सध्या, लोक ट्रूकॉलर (Truecaller) किंवा इतर अॅप्स वापरून अज्ञात नंबरवरून येणारे कॉल ओळखतात, जिथे वापरकर्ता मॅन्युअली नाव बदलू शकतो. मात्र सीएनएपी थेट टेलिकॉम कंपन्यांच्या डेटाबेसशी जोडलेले आहे, त्यामुळे फक्त आधार नाव प्रदर्शित केले जाईल.
कोणती कंपनी ही सेवा कोणत्या राज्यात देत आहे?
सध्या, ही सेवा वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केली जात आहे. रिलायन्स जिओने पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, राजस्थान, पंजाब, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये ही सेवा सुरू केली आहे. तर एअरटेलने पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू केली आहे. आणि वीआयने महाराष्ट्रातआणि तामिळनाडूमध्ये चाचणी सुरू केली आहे.तर सरकारी मालकीची बीएसएनएल सध्या पश्चिम बंगालमध्ये चाचणी घेत आहे.
कोणत्या राज्यात कोणती कंपनी?
जिओ (Jio):
• पश्चिम बंगाल
• केरळ
• बिहार
• उत्तर प्रदेश (पूर्व)
• राजस्थान
• पंजाब
• आसाम
• उत्तराखंड
• हिमाचल प्रदेश
• झारखंड
• ओडिशा
एअरटेल (Airtel):
• पश्चिम बंगाल
• गुजरात
• मध्य प्रदेश
• जम्मू आणि काश्मीर
T20 World Cup 2026 साठी ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा; संजू सॅमसनला मिळणार संधी?
Vi (Vodafone-Idea):
• महाराष्ट्र – सेवा लाईव्ह
• तामिळनाडू – चाचणी सुरू
