कॉक्रोच जनता पार्टीला 1 कोटींची मदत जाहीर; आंदोलकांसाठी वेबसाईट अन् कायदेशीर मदत पुरवणार

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीयं.

Untitle (21)

Cockroch Janta Party : कॉक्रोच जनता पार्टीने (Cockroch Janta Party) केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर आता ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबब्ल (Kapil Sibbal) यांनी आंदोलकांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान संपूर्ण देशभरात अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विशेषत: आसाम आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले असून देशभरातील सर्वच आंदोलकांना कायदेशीर मदत मिळावी म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाईट लॉंच करण्यात आली असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्या रत्ना सिंह यांनी दिली आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल, सौरभ दास, रत्ना सिंह बोलत होते.

आंदोलनादरम्यान संपूर्ण देशभरात पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. सीजेपीकडून सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. आंदोलकांवर कुठलीही कारवाई होऊ नये ही आमची मागणी असून पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याचं चित्र आहे. आम्ही एक वेबसाईट लॉंच केली असून जिल्ह्यावाईज वकीलांना आम्ही आंदोलकांच्या केस लढण्यासाठी विनंती करणार आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून आमच्याशी जोडा, त्या माध्यमातून आंदोलक विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरवणार असल्याचं सौरभ दास यांनी स्पष्ट केलं आहे.

थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी, बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळलं

तसेच पोलिसांनी कोणत्या उद्देशाने लाठीचार्ज केला आहे. या पोलिसांविरोधात आम्ही गुन्हा दाखल करुन कोर्टातही जाणार आहोत. वेबसाईवर कॉक्रोच जनता पार्टीने साक्षी नावाचे प्लॅटफॉर्म आम्ही लॉंच केले आहे. ज्यांच्याजवळ फोटो आहेत त्यांनी, माहिती द्यावी घटना लिहावी आमची टीम तुमच्याशी संवाद साधेल, असं आवाहनही दास यांनी नागरिकांना केले आहे.

पोलिसांकडून मुस्लिम आंदोलकांना टार्गेट – रत्ना सिंह
आसाममध्ये सात ते आठ एफआयर दाखल झाल्या आहेत. देशभरात वकिलांनी सहभागी व्हावं, यासाठी सीजेपीने वेबसाईट तयार केली असून पोलिसांकडून मुस्लिम समाजच्या आंदोलकांना टार्गेट केलं जातंय. आसाम पोलिसांकडून गुंड प्रवृत्तीची गुन्हे लावली जात असल्याचा आरोप रत्ना सिंह यांनी केला आहे. तसेच बिहारमध्ये रिपोर्ट मिळाला की, पटना, छबरामध्ये पोलिसांनी एके 47 चालवले आहेत. पटनामध्ये खूनाचा प्रयत्नाचा एफआयर दाखल झाला आहे. जी एफआयआर आलीयं आमच्याकडे त्यानुसार 86 लोकांना अटक केलीयं इतर आंदोलकांचा शोध सुरु असल्याच सिंह यांनी स्पष्ट केलंय.

कपिल सिब्बल यांच्याकडून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्याकडून कॉक्रोच जनता पार्टीला मदत जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सिब्बल यांनी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी कायद्याचा गैरवापर होईल त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी आम्ही वकील उभे राहणार आहोत. मी हा फंड फक्त आंदोलकांसाठीच खर्च करणार असून
दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी खर्च करणार नाही. सीजेपीला शक्य ती सर्व मदत करणार. आंदोलकांना वैयक्तिक टार्गेट केलं जातंय. आंदोलक किंवा त्याच्या कुटुंबियांना कोणताही त्रास नकोय, असं सिब्बल यांनी स्पष्ट केलंय.

follow us