पुन्हा एकदा कोरोनाचं सावट! देशात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रील…

पुन्हा एकदा कोरोनाचं सावट! देशात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रील…

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलीय.


भाजपचा ‘इलेक्शन’ बाण ! अयोध्येत पुजन झालेल्या ‘शिवधनुष्याची’ निघणार राज्यभर यात्रा

देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढलंय. आज नवीन 6 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 900 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कालच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे 5 हजार 336 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

एसटीचा रॉड तुटल्याने बसचा भीषण अपघात, महिला वाहकाचा जागीच मृत्यू

त्यामुळे देशामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 47 लाख 39 हजार 54 इतकी झाली आहे. तर मागील 195 दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे.

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गुलाल उधळला; पहिल्या उमेदवाराचा दणदणीत विजय

सध्या देशभरात 25 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सक्रिय असून मागील 24 तासांत महाराष्ट्रात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 3 हजार 987 कोरोनाबाधित सक्रिय आहेत.

दरम्यान, मॉक ड्रिलमध्ये बेड कॅपॅसिटी, मेडिसिन, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रीय आरोग्य विभाग आढावा घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube