एसटीचा रॉड तुटल्याने बसचा भीषण अपघात, महिला वाहकाचा जागीच मृत्यू

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T171923.304

Nashi Bus Accident :  नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक येथील देवळा- मनमाड रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महिला वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे व एका प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  सारिका लहिरे असे मृत महिला कंडक्टरचे नाव आहे. तर अनेक प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बसचे अपघात होताना पहायला मिळत आहे. आजही एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमधील 20 ते 22 प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Eknath Shinde मी सर्वांना कामाला लावले : …म्हणूनच घरात बसणारे आता रस्त्यावर उतरलेत!

ही बस मनमाड आगारातून सुटली होती व नांदूरीकडे गेली होती. नांदूरीवरुन ही बस परत येत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनाने या बसला कट मारला. त्यामुळे एसटीचा रॉड तुटला व चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस थेट समोरील झाडाला धडकली.

पालकमंत्री विखे अॅक्शन मोडमध्ये; नगरमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’

दरम्यान, या बसमध्ये प्रवाशांची बरीच गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी हे जखमी झाले आहेत. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.  अपघातात एका प्रवासी महिलेचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube