Mariamman Temple : तब्बल 100 वर्षांनंतर दलितांना मिळाला न्याय; एका वादानंतर मिळाला मंदीर प्रवेश

Mariamman Temple : तब्बल 100 वर्षांनंतर दलितांना मिळाला न्याय; एका वादानंतर मिळाला मंदीर प्रवेश

Tamilnadu Mandir: ही गोष्ट आहे भक्त आणि देवामधील 100 वर्षांच्या दूराव्याची. जो एका वादानंतर संपला आहे. त्यामुळे आता या मंदीरात दलितांना मंदीर प्रवेश आणि पूजेचे अधिकार मिळाला आहे. हे मंदीर दक्षिण भारतातील असून मरियम्मन मंदीर असं या मंदीराचं नाव आहे. तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात हे मंदीर आहे. तर 100 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने दलित आनंदी आहेत. (Dalits got justice after 100 years after a Dispute enter in mandir )

दलित समाजाला या मंदिरात प्रवेश देताना स्थानिक पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली होती. त्यामुळे सर्व काही शांततेत पार पडलं. तसेच चेल्लनकुप्पम गावात इतर ठिकाणी देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दलितांनी या मंदिर प्रवेशासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून कित्येक दशकांपासून लढा दिला होता.

1930 मध्ये महाराजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी या मंदिरात दलितांनी प्रवेश दिला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तो नाकारण्यात आला होता. त्यामुळे दलितांनी या मंदिर प्रवेशासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून कित्येक दशकांपासून लढा दिला होता. त्यात गेल्या जुलै महिन्यात दोन मित्रांमध्ये दलितांच्या मंदिर प्रवेशावरून वाद झाला.

यामध्ये एक दलित तर एक वन्नियार होता. ते एकाच शाळेत शिकले मात्र नोकरीसाठी चेन्नईला गेले. यात मारहाण झाली त्यामुळे प्रकरण प्रशासनात पोहचलं. या वादातून चेल्लनकुप्पम गावात मोठी क्रांती झाली. भक्त आणि देवामधील 100 वर्षांचा दूरावा दूर झाला आहे. 100 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने दलित आनंदी आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube