Namibian Cheetah Died : मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू

Namibian Cheetah Died : मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू

मध्य प्रदेशातील श्योपूर कुनो येथे नामिबियातून आणलेल्या साशा या मादी चित्ताचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास किडनी निकामी झाल्याने मादी चित्ता साशा नावाचा मृत्यू झाला आहे. याबाबत कुनो नॅशनल पार्ककडून सांगण्यात आले आहे.

Atique Ahmed : गाडीला अपघात, रस्त्यात लघुशंका अतिकला नेताना नेमके काय-काय घडले?

22 मार्च रोजी मादी चित्ता साशा पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुस्त अवस्थेत दिसून आली होती. त्यानंतर साशाला उपचारासाठी विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र, रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीत त्याच्या किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. साशाला भारतात आणण्यापूर्वीच किडनीच्या आजाराने ग्रासल्याने उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे.

मंत्री आठवले म्हणाले… तेव्हा जनताच राहुल गांधीनां धडा शिकवेल

काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेतून चित्तांचे दोन गट भारतात आणण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून चित्त्यांची ही पहिली तुकडी आली होती. चित्त्यांच्या या तुकडीला कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात आली होती. या 12 चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच माद्या होत्या. त्यांनाही कुनो राष्ट्रीय उद्यानातही सोडण्यात आले.

तीन महिन्यात काबूल दोनदा हादरले; बॉम्ब स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

साशा नावाची चित्ता मादी तिच्या नव्या घरात चांगल्या प्रकारे रहिवास करीत होती. साशाचा मृत्यू प्रकल्पालाच नाहीतर देशाच्या जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात नूकसान आहे. साशाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पथक तपास करीत आहे. साशा ही 5.5 वर्षांची मादी नामिबियन चित्ता होती. साशा 2017 च्या उत्तरार्धात पूर्व-मध्य नामिबियातील गोबाबिस शहराजवळील शेतात सापडली होती.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि भारताने गेल्या वर्षी आफ्रिकन देशातून चित्ते आणण्यासाठी सामंजस्य करार केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशातील कुनो येथे चित्ते स्थायिक झाले. जगातील बहुतेक चित्ते दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोत्सवाना येथे आहेत. नामिबियामध्ये चित्त्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. भारतातील शेवटचा चित्ता 1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरैया जिल्ह्यातील साल जंगलात मृतावस्थेत आढळला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube