मोठी बातमी! जंतरमंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीमार्च, वातावरण तापलं

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज केला आहे.

Delhi Police

देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. (BJP)  जंतरमंतरवर आंदोलन सुरू असून अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी ‘संसद मोर्चा’ संसदेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, वातावरण तापलं असून पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर-मंतरवरच पेटलंय. कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांवर जंतर-मंतर परिसरातचं दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. या विद्यार्थ्यांना जंतर-मंतरवरून संसदेत जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. पोलीस रोखत असतानाही आंदोलक संसदेकडे जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी आंदोकर्ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे, अशी माहिती मिळत आहे.

मोठी बातमी! सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार…, सरकारपुढं ठेवल्या या 3 अटी

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंगमो यांनी आज पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. काल, न्यायालयाने सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. आपल्या अपिलात, आंगमो यांनी असा युक्तिवाद केला की, रविवारच्या एकल न्यायाधीशांच्या आदेशानुसार वांगचुक यांना अटक न करता सफदरजंग रुग्णालयात बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले आहे आणि त्यामुळे त्यांच्या उपचारांबाबत ना कार्यकर्त्याला, ना त्यांच्या पत्नीला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

अपीलमध्ये म्हटलं आहे की, या आदेशात ‘माहितीपूर्ण संमती’ किंवा वैद्यकीय उपचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा व्यक्तीच्या हक्काचा उल्लेख नाही. दरम्यान, झुरळ जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास म्हणाले, सरकार आमच्याशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासन खूप उशिरा आले आहे, पण आम्ही त्यांच्याशी बोलण्यास पूर्णपणे तयार आहोत, असं आम्ही सांगितलं आहे. सध्या त्यांच्याकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद आलेला नाही आणि निर्णय आता त्यांच्या हातात आहे.

follow us