Shiv Jayanti : आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली

Shiv Jayanti : आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली

नवी दिल्ली : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून (Ajinkya Devgiri Pratisthan)आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमासाठी (Shiv jayanti at Agra fort) परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पुरातत्व विभागानं (Department of Archaeology) ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळं शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. आग्रा किल्ल्याच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांना दिली जाते, मग शिवजयंतीबद्दल भेदभाव का? असा प्रश्न शिवप्रेमींनी केलाय. आता शिवप्रेमींनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतल्याचं पाहायला मिळंतय.

साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्रा येथील किल्ल्यात नजरकैदेत ठेवलं होतं. या किल्ल्यातून शिवाजी महाराजांनी शिताफीनं स्वत:ची सुटका करुन घेतली होती. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळंच महत्त्व आहे.
त्यामुळं अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी केली जाणार होती. परंतु पुरातत्व विभागानं ही परवानगी नाकारल्याचं दिसून येतंय.

याच किल्ल्यामध्ये यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात होती. त्यानंतर आता मात्र शिवजयंतीलाच विरोध का? असा सवाल करत शिवप्रेमींनी पुरातत्त्व विभागाच्या विरोधामध्ये दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं दिसून येतंय.

शिव जयंती कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी, यासाठी थेट मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांनी पुरातत्त्व विभागाला पत्र दिलं होतं. मात्र, त्यालाही पुरातत्व विभागानं उत्तर दिलंच नाही. गेल्या दीड महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून चालढकल केली जात आहे. आता अखेर शिवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube