Viral Video : राष्ट्रगीताचा अवमान करणं तरुणाला पडलं महागात

Viral Video : राष्ट्रगीताचा अवमान करणं तरुणाला पडलं महागात

नवी दिल्ली : राष्ट्रगीताचा अवमान करणं (Disrespecting the National Anthem)उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. सोशल मीडियावर एका तरुणाचा राष्ट्रगीत सुरु असतानाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral)झाला. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ (Merath)येथील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अदनान असं नाव असलेल्या आरोपीला अटक केली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या इतर तरूणांचा शोध सुरु असल्याची माहिती मेरठ पोलिसांनी दिलीय.

राष्ट्रगीत चालू असताना सावधान अवस्थेत उभे राहावे असं आपल्याला प्राथमिक शिक्षण घेतानाच सांगितलं जातं. आपण त्याचा अवलंब लहानपणापासून करत आहोत. राष्ट्रगीत सुरू असताना कसलीच हालचाल करत नाहीत. पण एका तरुणानं राष्ट्रगीत सुरू असताना हालचाल करत चक्क डान्स केलाय. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

त्याच्याबद्दल अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिन हा देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. प्रत्येक शाळेत आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण केलं जातं. यावेळी राष्ट्रगीतासाठी सर्वजण सावधान अवस्थेत उभे राहतात. पण एका तरूणानं राष्ट्रगीत सुरू असताना डान्स करून अपमान केल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा तरूण उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube