दिल्लीत आज पुन्हा भूकंपाचे धक्के; 24 तासात दुसऱ्यांदा हादरे

दिल्लीत आज पुन्हा भूकंपाचे धक्के; 24 तासात दुसऱ्यांदा हादरे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi)आज (दि.22) पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake)सौम्य धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत 2.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होता. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप सायंकाळी 4.12 वाजता झाला आहे. त्याच्याआधी मंगळवारी रात्री उशीरा दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR)उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रात्री दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीर(Jammu kashmir), राजस्थान(Rajasthan), पंजाब(Panjab), हरियाणा(Hariyana), उत्तर प्रदेश(Uttar Pradesh), उत्तराखंडमध्येही (Uttarakhand)भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

रात्री भूकंपाची तीव्रता इतकी होती की, अनेक भागातील लोक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आणि उद्यानांमध्ये जाऊन बसले होते. राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये रात्री उशिरा झालेल्या भूकंपानं लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं.

नीतू घंघासने ‘महिला जागतिक बॉक्सिंग’ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित

रात्री लोक एकमेकांशी भूकंपाची चर्चा करत होते. भूकंपानंतर लोकं जवळच्या नातेवाईकांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. त्यातच आता आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पुन्हा घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

भारताबरोबरच अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतांमध्ये होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजली गेली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube