ED Raid : लालूंच्या अडचणी वाढणार? दिल्लीपासून मुंबईपर्यंत ED ची छापेमारी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 10T120655.308

Land For Jobs Scam Case : जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. सीबीआयनंतर आता याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली, बिहारमध्ये छापेमारे करण्यास सुरू केली आहे. लालुंच्या कुटुंबीयांच्या दिल्ली, मुंबई आणि बिहारमधील निवासस्थानांवर ही छापेमारी केली जात आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी आयआरसीटीसी प्रकरणातही ईडीची एक टीम लालूंच्या जवळच्या अबू दुजानाच्या घरी पोहोचली होती.

या नोकरी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं लालू यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याशिवाय त्यांच्या मुलींच्या घरी ईडीनं दिल्लीतील 15 ठिकाणी ही छापेमारी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. याशिवाय याप्रकरणी राबडी देवी यांची देखील सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.

XI Jinping यांची ताकद वाढली, सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारणारे ठरले पहिले राष्ट्रपती

नेमका घोटाळा काय?

जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचं हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कथित ‘ग्रुप-डी’ नोकरीशी संबंधित आहे. 2004-2009 दरम्यान मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आले होते आणि त्या बदल्यात जमीनी देण्यात आल्याचा आरोप लालू प्रसाद यांच्यावर आहे. याशिवाय लालुंच्या कुटुंबीयांनी लोकांकडून 1,05,292 चौरस फूट जमीन घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Tags

follow us