Union Budget 2023 : सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्ती कर नाही
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी करधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची
(income tax) मर्यादा सात लाख इतकी केली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
नवीन टॅक्स स्लॅब
3 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त
3 ते 6 लाख – 5 टक्के कर
6 ते 9 लाख- 10 टक्के
9 ते 12 लाख – 12 टक्के
12 ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के कर भरावा लागणार
सध्याची कर उत्पन्न (Income Tax) मर्यादा किती?
सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
ज्येष्ठ नागरिक बचत योजना अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.
महिलांसाठी बचत योजना
महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.