Rajdhani Express : मोठी बातमी! तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या ‘B-1’ डब्यात आग
Rajdhani Express : तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणाऱ्या 12431 राजधानी एक्सप्रेसच्या 'बी-1' (B-1) या वातानुकूलित डब्यात
Rajdhani Express : तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणाऱ्या 12431 राजधानी एक्सप्रेसच्या ‘बी-1’ (B-1) या वातानुकूलित डब्यात रविवारच्या सकाळी आग लागली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली. माहितीनुसार, लुनिरीचा (LNR) आणि विक्रमगड आलोट (VMA) या स्थानकांदरम्यानच्या ‘डाऊन लाईन’वर वातानुकूलित डब्यात आग लागली होती. डब्यात आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रेल्वे प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5:15 ते 5:30 च्या दरम्यान ‘बी-1’ डब्याच्या SLR डब्याकडील टोकाजवळ आग भडकली. त्यावेळी या डब्यात सुमारे 68 प्रवासी प्रवास करत होते. धूर निघू लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि डब्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूपपणे इतर डब्यांमध्ये हलवले. यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
🚨 BREAKING
Fire in 2 coaches of Trivandrum-Delhi Rajdhani Express near Ratlam.
Third AC coach gutted.
All passengers safely evacuated — no casualties. Delhi-Mumbai route hit.#RajdhaniExpress #RailFire pic.twitter.com/uyR2lW5FgN
— Public News X (@PublicNewsX) May 17, 2026
रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, आगीचा फैलाव होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘ओव्हरहेड इलेक्ट्रिक’ (OHE) वीजपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. त्यानंतर, आगीच्या विळख्यात सापडलेला ‘बी-1’ डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. मदत आणि बचावकार्य अत्यंत वेगाने राबवण्यात आल्यामुळे, आगीचा फैलाव इतर डब्यांपर्यंत होण्यापासून रोखण्यात यश आले.
#WATCH | Ratlam, Madhya Pradesh: Restoration work is underway at the railway track between Luni Richha (LNR) and Vikramgarh Alot (VMA) stations as a fire breaks out in B-1 coach (near SLR end) of Train No. 12431 Thiruvananthapuram–Hazrat Nizamuddin Rajdhani Express, earlier… pic.twitter.com/ALpvq3zeFS
— ANI (@ANI) May 17, 2026
आणखी एक धक्का; पेट्रोल-डिझेलनंतर मोबाईल रिचार्जही महाग होणार?
कोटा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यांना इतर डब्यांमध्ये हलवण्यात आले. तसेच, त्यांचा कोटापर्यंतचा पुढील प्रवास सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर, प्रवाशांच्या सोयीसाठी कोटा स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची योजनाही आखण्यात आली, जेणेकरून त्यांचा उर्वरित प्रवास सुरळीतपणे पार पडेल.