ब्रेकिंग न्यूज : गँगस्टर अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या
Atique Ahmed : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आली आहे. या दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे.
अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हल्ला झाल्यांनतर मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हत्या घडविणाऱ्यांकडून काही घोषणा देण्यात आल्या आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवलेश, सनी, अरुण मौर्य अशी त्यांचे नावे आहेत. तिघांनीही आत्मसर्मपण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलजवळ पोलिसांचे पथक अतिक आणि अहमद यांना घेऊन जात असताना हा हल्ला झाला. यावेळी तीन-चार हल्लेखोर अचानक मध्यभागी पोहोचले आणि त्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण हल्ला मीडिया आणि पोलिसांसमोर करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींवर गोळीबार झाला तेव्हाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.