जागतिक स्तरावर अस्थिर वातावरणाचा फटका; सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही महागली

  • Written By: Published:
जागतिक स्तरावर अस्थिर वातावरणाचा फटका; सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही महागली

Gold And Silver Latest Rate : सध्या जागतिक स्तरावर अस्थिर वातावरण आहे. (Gold) त्यामुळे गुंतवणुकीसाठी सोनं व चांदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सोने प्रति १० ग्रॅम ७८ हजार ३८३ रुपये (जीएसटीसह) आणि चांदी प्रतिकिलो ९७ हजार ६५० (जीएसटीसह) रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे.

सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात शुभकार्य केले जात नाही. सोबतच काही वस्तू खरेदीलाही हा काळ योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातील सराफा व्यवसायात सध्या दागिन्यांची मागणी तीस ते चाळीस टक्के कमी झाली आहे. नवरात्रोत्सवापासून दागिने खरेदी केले जातील. आणखी दर वाढण्याच्या शक्यतेने सध्या गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत. यंदा चांदीच्या दरात महिनाभरात आठ हजारांची वाढ झाली. ३० ऑगस्टला चांदी ८५ हजार रुपये (प्रतिकिलो) होती. आज चांदी ९३ हजारांवर पोचली आहे. जीएसटीसह चांदी ९७ हजार ६५० रुपयांवर पोचली आहे.

मोठी बातमी! रिलायन्स-डिज्ने यांच्यातील कराराला केंद्र सरकारची मंजुरी हे मोठे बदल होण्याची शक्यता

जागतिक स्तरावर युद्ध सुरू असून, हे सध्यातरी थंड होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गुंतवणूकदारांना या काळात सोने-चांदीत गुंतवणुकीची मोठी संधी आहे. दसरा दिवाळीत सोने, दरात मोठी वाढ होऊ शकते.

महिनाभरात सोन्याच्या दरात साडेचार हजारांनी वाढ ३० ऑगस्टला सोने ७३ हजार रुपयांना (प्रति १० ग्रॅम) होते. मागील २८ दिवसांत सोन्याच्या दरात चार हजार ५०० रुपयांची तेजी आली. आज शनिवारी (ता. २८) ७६ हजार १०० रुपये दर होता. तीन टक्के जीएसटीसह सोने ७८ हजार ३८३ वर पोचले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube