सोनं उच्चांकापेक्षा 50 हजारांनी स्वस्त, तुमच्या शहरातले आजचे दर काय?

कालप्रमाणेच आजही सोन्याचे दर खाली घसरले. सोमवार 4 में रोजी सोन्याची किंमत समोर आली आहे.

News Photo   2026 05 04T121109.201

सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा (Gold) विषय असलेल्या सोन्याच्या किमती सतत वरखाली होत राहतात. अमेरिक आणि इराणच्या युद्धाचा फटका, डॉलरची किंमत या सर्व गोष्टींचा सराफा बाजारावर परिणाम होताना दिसतो. सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झालेली दिसत आहे. सर्वकालीन उच्चांकापेक्षा सोनं 50-52 हजारांनी खाली आलं आहे.

जगातील विविध घडामोडी, इराण-अमेरिका युद्ध,अशांतता यामुळे जागतिक बाजारपेठही अस्थिर असून त्याचा डायरेक्ट परिणाम सोनं आणि चांदीवर झाल्याचं दिसून आलंय. युद्धामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दर अस्थिर झालेले दिसत आहेत.

सोने-चांदीच्या दरात घसरण; सोनं 1200 रुपयांनी स्वस्त तर चांदी

काही महिन्यांपूर्वी सोन्याने र्वकालीन उच्चांक गाठला, 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत ही 2 लाख रुपयांच्या आसपास होती. मात्र त्यानतंर सोन्याचे दर खाली घसरले. या आठवड्याच्या सुरूवातीला 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे दर खाली घसरलेले दिसून आले. जागतिक घडामोडींचा सोन्याच्या किमतींवर डायरेक्ट परिणाम दिसून आला.

कालप्रमाणेच आजही सोन्याचे दर खाली घसरले. सोमवार 4 में रोजी सोन्याची किंमत समोर आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 15,113 रुपये आहे तर 10 ग्रॅमसाठी 1,51,130 रुपये दर आहे. चांदीच्या दरातही घसरण सुरू असून, त्यामुळे बाजारात विविध कल दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय दरांमध्येही किंचित घट दिसून येत आहे. चला तर मग, आज तुमच्या शहरातील सोन्याचा आणि चांदीचा भाव काय?

 

 

follow us