Gold Rate : सोना कितना सोना है! सोन्याच्या किमतीने रचला इतिहास, पार केला 60 हजारांचा टप्पा

Gold Rate : सोना कितना सोना है! सोन्याच्या किमतीने रचला इतिहास, पार केला 60 हजारांचा टप्पा

सोन्याच्या दरामध्ये आज अचानक1451 रुपयांची तेजी पहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये 1477 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर आज 60,000 रुपयांच्या पार गेला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये ही भाववाढ झालेली पहायला मिळते आहे.

गेल्या एका महिन्यापासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. जळगावमध्ये सोन्याचा दर 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होते आहे. मागच्या तीन दिवसांतील आज सर्वाधिक पातळीवर सोन्याचा दर पोहोचला आहे.

Amritpal Singh : खलिस्तानी आंदोलन, अमित शाहांना धमकी; कोण आहे अमृतपाल सिंग खालसा?

जागतीक पातळीवर अनेक बँका या तोट्यात गेल्या आहेत. अनेक बँकांचे दिवाळे निघाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बँकांमधील पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अचाकनपणे सोन्याच्या दरात झालेल्या वाढीने सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली आहे.

कालच्या दिवशी जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचा दर हा 59800 एवढा होता. आज तो 62000 एवढा झाला आहे. जीएसटीसहा सोन्याचा दर 62006 एवढा झाला असून येत्या काळात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम

ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये ही भाववाढ झाली आहे. सध्या सणासुदीचा व लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे आपल्याकडे सोने खरेदीचीही लगबग सुरु आहे. दोन दिवसांनंतर गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. त्यामुळे त्या दिवशी अनेक लोक सोने खरेदी करतात. पण आता अचानक सोन्याच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube