Sahara India च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! रिफंड पोर्टल लॉन्च, 45 दिवसांत मिळणार पैसे

Sahara India च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! रिफंड पोर्टल लॉन्च, 45 दिवसांत मिळणार पैसे

Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. (Good news for Sahara India Investors Refund Portal launch money will got in 45 days )

Subhedar : ‘मावळं जागं झालं रं…’; ‘सुभेदार’ सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे आता 45 दिवसांत त्यांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. अशी माहिती स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. यामध्ये कोट्यावधी लोकांनी पैसे गुंतवले असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने 29 मार्चला सहारा समुहाच्या 10 कोटी गुंतवणुकदारांना नऊ महिन्यांच्या आत पैसे परत केले जातील अशी घोषणा केली होती.

पंकजा मुंडेंशी जवळीक भोवली? जानकरांना NDAचे निमंत्रण नाही

ही घोषणा न्यायालयाकडून 5 हजार कोटींच्या सहारा सेबी रिफंड खात्यातून केंद्रीय सहकारी समिती रजिस्ट्रार (सीआरसीएस) ला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर करण्यात आली होती. या चार समित्यांमध्ये सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन यूनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचा समावेश आहे.

तर आता रिफंड पोर्टलद्वारे ज्या गुंतवणुकदारांची गुंतवणूक मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे. त्यांना रक्कम परत केली जाणार आहे. या परताव्यासंबंधी सर्व माहिती या रिफंड पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube