पंकजा मुंडेंशी जवळीक भोवली? जानकरांना NDAचे निमंत्रण नाही

पंकजा मुंडेंशी जवळीक भोवली? जानकरांना NDAचे निमंत्रण नाही

NDA Meeting at Delhi :  भाजपने आपल्या सर्व घटक पक्षांची म्हणजेच एनडीएची बैठक आज दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीसाठी देशभरातील छोटे-मोठे 38 पक्ष उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातून या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे व प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे देखील उपस्थित राहणार आहे. ( BJP NDA Meeting at Delhi )

भाजपने देशभरातील 38 छोटे-मोठे पक्ष एकत्र केले आहे. परंतु भाजपचा जुना मित्र पक्ष असलेला महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष याला निमंत्रण देण्यात आलेले नाही. महादेव जानकर यांनी 2014 साली एनडीएच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी जानकरांनी सुळेंच्या विरोधात जोरदार लढत दिली होती.

Narendra Modi : लेबल कुछ है और माल कुछ है ! विरोधकांची बैठक म्हणजे ‘कट्टर भ्रष्टाचारी संमेलन’

पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जानकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या विरोधात भाष्य केले होते. तसेच महादेव जानकर हे भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या जवळचे नेते मानले जातात. पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून त्यांच्यावर मध्य प्रदेशच्या सह-प्रभारीपदाची जबाबदारी आहे. महादेव जानकर हे पंकजा मुंडेंचे मानस भाऊ म्हणून ओळखले जातात.

पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीसोबत आल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण दोन महिने सुट्टी घेणार असल्याचे म्हटले होते. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी फॉर्म भरायला सांगून ऐनवेळी फॉर्म मागे घ्यायला लावला, असे त्यांनी सांगितले. तसेच पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. तेव्हा पंकजा मुंडेंनी या चर्चा नाकारल्या होत्या.

बच्चू कडूंचा मोठा डाव! मंत्रिपदावरील दावा सोडला पण नव्या मागणीनं CM शिंदेंपुढे वाढला पेच

पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंशी असलेली जवळीक महादेव जानकरांना भोवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच जानकर यांना भाजपने आपल्या बैठकीपासून दूर ठेवल्याची चर्चा सुरु झाली आहे. यानंतर जानकरांनी माध्यमांशी बोलताना माझी त्यांना गरज वाटली नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच जेव्हा माझे आमदार व खासदार निवडून येतील तेव्हा ते माझ्याकडे येतील असे जानकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube