Hindenburg Research चा Gautam Adani ना इतका मोठा झटका, पाहा किती कोटींनी संपत्ती घटली ?

  • Written By: Published:
Hindenburg Research चा Gautam Adani ना इतका मोठा झटका, पाहा किती कोटींनी संपत्ती घटली ?

Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या (Adani group) शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.

फोर्ब्स रिअल टाईम बिलियनियरच्या नव्या आकडेवारीनुसार काल (३ फेब्रुवारी) पर्यंत शेअर्सच्या घसरणीमुळे ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्ती (Gautam Adani Net Worth) मध्ये २७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 24 अब्ज डॉलर (भारतीय रुपयानुसार 20,09,09,92,25,000) घसरून 64.7 अब्ज डॉलर झाली आहे. यासोबत गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या तिसऱ्या क्रमांकावरून १६व्या क्रमांकावर घसरले आहेत.

“हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल खोटा असून हा भारताविरुद्धचा कट आहे” अस स्पष्टीकरण अदानीग्रुपकडून दिल असलं तरी अदानी ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलं आहे. दोन दिवसापूर्वी अदानी एंटरप्रायझेसचा 20,000 कोटी रुपयांचा एफपीओही त्यानी रद्द केला.गौतम अदानी यांनी स्वत: एक निवेदन जारी करून गुंतवणूकदारांना समूहावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यांच्या आवाहनाचा गुंतवणूकदारांवर काहीही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.

दहापैकी नऊ शेअर्स घसरले

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बुधवारी २५% घसरले आणि तर काल ते २१% घसरून १६७८ रुपयांवर आले आहेत. गेल्या पाच वर्षांत स्टॉक ८०० टक्‍क्‍यांनी वाढला होता परंतु पाच दिवसांत ४० टक्‍क्‍यांहून अधिक घसरला आहे.

त्याचप्रमाणे अदानी पॉवरमध्ये पाच टक्के, अदानी पोर्ट्समध्ये ३.७४ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये १० टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १० टक्के, एसीसी लि. लि. ०,२९ टक्के, अदानी ट्रान्समिशन १० टक्क्यांनी, एनडीटीव्ही पाच टक्क्यांनी आणि अदानी विल्मार पाच टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अंबुजा सिमेंट्स 3.12 टक्क्यांनी वाढला होता. या सर्व कंपन्यांचे शेअर्स बुधवारी घसरले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube