Bharat Jodo Yatra : भावा-बहिणीच्या स्नो फाईटने भारत जोडोची सांगता

Untitled Design (85)

श्रीनगर : भारत जोडो यात्रेची सांगता होत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीची स्नो फाईट झाली. यावेळी ते दोघेही अगदी लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळले. हा व्हिडीओ नॅशनल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला.

आज श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीसह कॉंग्रेस नेत्यांमध्येही हलके-फुलके वातारवरम पाहायला मिळाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीची स्नो फाईट झाली.

तसेच इतर नेत्यांनीही बर्फामध्ये खेळण्याचा आनंद लुटला. हा व्हिडीओ नॅशनल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करताना त्यांनी या व्हिडीओला ‘शीन मुबारक!’ असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या उपस्थितीत राष्ट्र ध्वज फडकवण्यात आला. त्याचबरोबर श्रीनगरमध्ये प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पीसीसी) मुख्यालयात 4,080 किलोमीटर पायी यात्रेचा समारोप करण्यात आला. शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक रॅली झाली, जिथे काँग्रेस नेत्यांसह DMK, नॅशनल कॉन्फरन्स, PDP, CPI, RSP आणि IUML यासह अनेक विरोधी नेते मोर्चात सामील झाले.

Tags

follow us