Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था एक चमकता तारा – निर्मला सीतारामन

Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था एक चमकता तारा – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, ‘2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सागर करत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ७५ वर्षांचा लेखाजेखा आणि आगामी 100 वर्षांत आपल्याला कोणता टप्पा गाठायचाय याची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी जग भारताच्या अर्थव्यवस्थेकडे एक चमकता तारा म्हणून पाहत आहे.’

‘जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र पाय घट्ट रोवून उभी आहे. जी पावलम आपण उचलली आहेत त्यामुळे आपलं भविष्य उज्वल आहे. त्यामुळे आपण जी प्रगती करत आहोत. ती पाहून ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले ते आपल्याला आशीर्वात देतील. जागतिक मंचावर भारताचं महत्त्व वाढत आहे. करण आपण कोविन अॅप असो, यूपीआय सारखं आपण उचललेल पाऊल असो या लगळ्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं महत्व वाढच आहे.’

कोरोना काळामध्ये देखील केंद्र सरकाने सर्वांना अन्न मिळेल कोणीही उपाशी झोपणार नाही. याची काळजी घेतली. तर गेल्याचं महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये अंत्योदय योजना सुरू केली. त्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहचवण्यात येत आहे. संपूर्ण जगात मंदी असताना आपल्याला जी-20 चं आयोजन करण्याचा मान मिळाला. त्यामुळे आपण काय काम कारतो. हे जगाला दाखवण्याची ही संधी होती.

पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात आपली अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. याचं कारण म्हणचे विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी. शाश्वतविकासासाठी आपण विविध योजना राबवल्या. या योजनांनी गेल्या 9 वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला. ही खूप आनंदाची बाब आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube