लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची.., अजानवर भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांचं वादग्रस्त विधान
बंगळूरु : वादग्रस्त विधाने करुन कायमच चर्चेत राहणारे कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते के.एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa ) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अल्लाहाला बोलावण्यासाठी लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची गरज काय आहे, अजानच्या आवाजाने माझं डोकं दुखतं असल्याचं वादग्रस्त विधान ईश्वरप्पा यांनी केलं आहे. कर्नाटकात एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय.
Jitendra Awhad : ठाण्यात फडणवीस नव्हे तर, शिंदेचं गृहमंत्री; आव्हाडांचा हल्लाबोल
ईश्वरप्पा पुढे बोलताना म्हणाले, एका कार्यक्रमात ईश्वरप्पा यांचं भाषण सुरु होतं. त्याचवेळी एका मशिदीमधून अजान सुरु होती. अजानचा आवाज आल्यानंतर मी जिथं जातो तिथं या अजानमुळे माझी डोकेदुखी वाढते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे, आज नाहीतर उद्या अजान बंद होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
तसेच हिंदूही मंदिरात भजन आणि प्रार्थना करतात, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहोत. दरम्यान, हिंदु समाज मुस्लिम समाजापेक्षाही धार्मिक असून तेही मंदिरात भजन प्रार्थना करीत असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
ठाकरेंनी जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवलं, वैभव नाईकांची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींनी सर्व धर्मांचा आदर करण्यास सांगितले असून अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वापरल्यावरच अल्लाह नमाज ऐकतो का? हिंदूही मंदिरात भजन-प्रार्थना करतात ना? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत आम्ही देखील त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक असल्याचं ठणकावून सांगितलंय.
ही भारतमाता आहे की, जे धर्मांचे रक्षण करते. पण जर तुम्ही म्हणत असाल की, अल्लाह तेव्हाच ऐकतो जेव्हा ते लाऊडस्पीकरवरून अजान ऐकतो. तर मी जरूर विचारेन की, मग काय अल्लाह बहिरा आहे का?, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केलं आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा वादग्रस्त विधाने करण्याचे प्रकार समोर आले आहेत. याआधीही ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. म्हैसूरचा शासक टिपू सुलतान मुस्लिम गुंड असे ईश्वरप्पा यांनी संबोधले होते. आताही त्यांनी मुस्लिमांविरोधात वादग्रस्त विधान केल्याने कर्नाटकातील मुस्लिम बांधवांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.