कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलणार?, सिद्धरामय्या यांना पद सोडण्याचे हायकमांडचे आदेश

दिल्लीतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वेणुगोपाल यांनी कर्नाटकच्या नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

News Photo   2026 05 26T213725.280

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलाचे संकेत दिल्लीतून मिळत आहेत. (Karnatak) मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्ली येथे आले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत येण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.

कर्नाटकमधून राज्यसभेवर येऊन दिल्लीत मोठी भूमिका पार पाडण्याची ऑफर सिद्धरामय्या यांना दिली गेली आहे. मात्र सिद्धरामय्या यांनी अद्याप याचा विचार केला नसल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

शाळांमध्ये आता Yes Sir ऐवजी जय श्री राम म्हणण्याची मागणी; जनार्दन रेड्डींच्या विधानाने कर्नाटकमध्ये नवा राजकीय वाद

दिल्लीतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वेणुगोपाल यांनी कर्नाटकच्या नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या. दोन तास चाललेल्या बैठकीत केवळ राज्यसभा आणि कर्नाटक विधान परिषद निवडणुकीवरच चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

निवडणुकीपूरतीच होती. माध्यमे जो अंदाज बांधत आहेत, तो निराधार आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते. फक्त राज्यातील निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाली. त्यामुळे शक्यता वर्तवणे योग्य नाही”, असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले.

follow us