शाळांमध्ये आता Yes Sir ऐवजी जय श्री राम म्हणण्याची मागणी; जनार्दन रेड्डींच्या विधानाने कर्नाटकमध्ये नवा राजकीय वाद
कोप्पल येथे पत्रकारांशी संवाद साधताना जनार्दन रेड्डी म्हणाले की, यत्नाळ आमच्या पक्षात नसले तरी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे.
Janardhana Reddy’s statement sparks new political controversy in Karnataka : कर्नाटकमध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी शैक्षणिक वातावरणात पारंपरिक अभिवादन बदलण्याच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी माजी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. यत्नाळ यांनी विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरीवेळी शक्षकांना येस सर म्हणण्याऐवजी जय श्री राम म्हणावे असे आवाहन केले होते. या वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे.
MLA & BJP Leader Janardhan Reddy bats for students saying “Jai Shree Ram” during the attendance calls instead of the usual “Yes sir” or “Present Sir”. MLA Basanagouda Patil Yatnal had proposed this idea after the K’taka govt decided to allow Hijab in schools and colleges. pic.twitter.com/D1O826fBnX
— Deepak Bopanna (@dpkBopanna) May 22, 2026
कोप्पल येथे पत्रकारांशी संवाद साधताना जनार्दन रेड्डी म्हणाले की, यत्नाळ सध्या आमच्या पक्षात नसले तरी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेले अभिवादन वापरणे चुकीचे नाही. येस सर ऐवजी जय श्री राम म्हणणे योग्यच आहे आणि मी त्याला पूर्ण समर्थन देतो. यावेळी रेड्डी यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भरतोय संस्कृती आणि हिंदुत्वाची ओळख जपण्याची गरज असल्याचे देखील सांगितले. ते म्हणाले मी अनेक शैक्षणिक संस्थांना भेट देतो. विद्यार्थ्यांनी भगवी शाल आणि भगवी पगडी परिधान करून आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करावा. आपण भारतीय आहोत आणि हा आपल्या सनातन परंपरेचा प्रश्न आहे.
Petrol Diesel Price Hike : मोठा धक्का! तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर; जाणून घ्या नवीन दर
दरम्यान, या वक्तव्याची पार्श्वभूमी देखील तितकीच महत्वाची मनाली जात आहे. अलीकडेच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने 2022 मध्ये लागू करण्यात आलेली वर्गात हिजाब घालण्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धार्मिक चिन्हे, पोशाख आणि शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक ओळख या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून या निर्णयाला विरोध दर्शवला जात असून, हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्यावर भर दिला जात आहे.
याचदरम्यान, राज्य सरकारने कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद येथील लादले मशक दर्गा दंगल प्रकरणातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. 1 मार्च 2022 रोजी झालेल्या या प्रकरणात दर्ग्यात शिवलिंग शुद्धीकरणाची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे तणाव निर्माण होऊन हिंसाचार उसळला होता.
काँग्रेसने हे खटले राजकीय हेतूने दाखल केल्याचा दावा केला आहे, तर भाजपने सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. या सर्व घडामोडींमुळे कर्नाटकात धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय मुद्द्यांवरून पुन्हा एकदा जोरदार संघर्ष रंगताना दिसत आहे.