चेंगराचेंगरीत आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू; विजयच्या पक्षातील नेत्यांवर अखेर गुन्हा; सीबीआयची चौकशी होणार ?

Karur stampede tragedy: . आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झालाय. तर 60 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. यात काही जणांची प्रकृती नाजूक आहेत.

  • Written By: Published:
Karur stampede tragedy: Police files case against Vijay's TVK as toll rises to 40

Karur stampede tragedy: तमिळनाडूतील करूर (Karur) येथे अभिनेते थलपती विजयच्या (Thalapathy Vijay) रॅलीमध्ये चेंगराचेंगरी (Karur stampede tragedy) झालीय. यात आता मृत्यूचा आकडा वाढलाय. आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झालाय. तर 60 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. यात काही जणांची प्रकृती नाजूक आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या चेंगराचेंगरीमागे वेगवेगळ्या कारणे सांगितले जात आहे. परंतु आता विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम (TVK)पक्षाच्या नेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


मोठी बातमी! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार, नुकसानग्रस्तांची भेट घेणार

अभिनेता-राजकारणी विजयच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाच्या विविध नेत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. टीव्हीके पक्षाचे वरिष्ठ नेते बस्सी आनंद, निर्मल कुमार आणि व्हीपी मथिलागन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी व्ही सेल्वराज यांनी दिली. मर्यादेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने ही घटना घडलीय. टीव्हीकेने पोलिसांनी परवानगी घेतली होती. या रॅलीत दहा हजार लोक सहभागी होणार होते. परंतु प्रत्यक्षात दुप्पट तिप्पट गर्दी झाली. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.


मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची वर्णी; वाचा, कोण आहेत मन्हास?


मृतामध्ये महिलांचा अधिक सहभाग

रविवारी मृत्यूंची संख्या वाढली असून, आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिलांची संख्या जास्त आहे. यात तेरा पुरुष, 17 महिला आणि लहान मुले अशा चाळीस जणांचा मृत्यू झालाय. या मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाखांची मदत देण्यात आली आहे. (Karur stampede tragedy: Police files case against Vijay’s TVK as toll rises to 40)

टीव्हीकेची मद्रास उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
गुन्हा नोंदविण्यानंतर टीव्हीके पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रॅली उधळून लावण्यासाठी कट रचला होता. त्यातून दगडफेक झाली, अशी याचिका टीव्हीकेने दाखल केलीय. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशीची मागणी टीव्हीकेने केलीय.

follow us

संबंधित बातम्या