Hanuman Jayanti: धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा, गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

Hanuman Jayanti: धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा,  गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) बुधवारी सर्व राज्यांसाठी एक महत्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. हनुमान जयंतीला देशात शांतता कायम ठेवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, जातीय सलोखा बिघडवण्याऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा, असे गृह मंत्रालयाने अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे.

उद्या देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रसह देशभर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली होती. मात्र, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह काही ठिकाणी दंगली झाल्यानं या उत्सवाला गालबोट लागलं होतं. अशाच घटनांची हनुमान जंयतीला पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता केंद्रीय गृहमंत्रालयाने खबरदारी म्हणून राज्यांना निर्देश दिले आहेत. या निर्देशामध्ये सांगण्यात आलं की, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. हनुमान जयंती शांततेप पार पाडावी. सामाजिक शांतता भंग करणारा कोणताही प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्याच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्रायाने दिल्या आहेत. गृहमंत्रालयाने ट्विट करत याबाबती माहिती आहे.

Nitin Deshmukh : ओरिजिनल दूध प्यायला असाल तर ठाकरेंना अडवून दाखवा

पश्चिम बंगाल राज्यात रामनवमीच्या मुहूर्तावर काही ठिकाणी दंगल झाली होती. दरम्यान, हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर आता कोलकात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यात शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय दलांची नेमणूक करण्याची विनंती करावी, असं सांगितलं. राज्याकडून अशी मागणी आल्यावर केंद्रानेही त्यावर तात्काळ कारवाई करावी, असं कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाने सांगितलं की, गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता, खबरदारी घेण्यासाठी हे आदेश दिले आहेत.

गुरूवारी होणाऱ्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमध्ये कलम 144 जारी करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुढच्या चोवीस तासासाठी कलम 144 लागू असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube