Kerala News : पद्मलक्ष्मी बनली पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील!
केरळ : केरळ राज्याची पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील म्हणून पद्मलक्ष्मी या बनल्या आहेत. लहानपणापासून पद्मलक्ष्मी यांनी वकील बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. राज्याचे कायदामंत्री पी. राजीव यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देत पद्मलक्ष्मी यांचे अभिनंदन केले.
पद्मलक्ष्मी यांनी भौतिकशास्त्र (Physics) या विषयात पदवी शिक्षण घेतल्यानंतर एल. एल. बी (LLB) साठी प्रवेश घेतला होता. पद्मलक्ष्मी यांनी जेव्हा आपल्या आई-वडिलांना वकील बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी खंबीर पाठिंबा देत प्रोत्साहन दिले. १५२९ पदवीधरामध्ये पद्मलक्ष्मी या एक होत्या. त्यांना काल आयोजित केलेल्या नामांकन समारंभात बार कौंशीलच्या वतीने अधिवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.
Ashok Pawar यांचा विधानसभेत टाहो… कुणी ‘तहसीलदार’ देता का ‘तहसीलदार’?
केरळचे कायदा मंत्री पी. राजीव यांनी पद्मलक्ष्मी यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. राजीव म्हणतात की, पद्मलक्ष्मी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत कठोर मेहनत करत वकील बनल्या आहेत. त्या केवळ वकील बनल्या नाहीत तर संपूर्ण केरळ राज्यातील पहिल्या ‘ट्रान्सजेंडर’ वकील देखील बनल्या आहेत. त्यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या असतील. अनेकांनी त्यांना वकील होऊ नये म्हणून मागे ओढले असेल. पण त्यांनी मात्र अडचणी, त्रास सहन करत मेहनतीने आपले नावे कायद्याच्या इतिहासात अजरामर केले आहे.