‘वयाच्या आठव्या वर्षी वडिलांनी लैंगिक शोषण…; भाजपाच्या महिला नेत्याने सांगितली आपबिती !
नवी दिल्ली : भाजपच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला. खुशबू सुंदरने म्हटले आहे की, मी ८ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी खुशबू ‘कलियुग पांडवुलु’ (Kaliyuga Pandavulu) या चित्रपटात हिरोईन बनली होती.
कलियुग पांडवुलु (Kaliyuga Pandavulu) चित्रपटानंतर, खुशबू सुंदर ही साउथ फिल्म इंडस्ट्रीची (South Film Industry) स्टार म्हणून कामाला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून दुसरी इनिंग सुरू केली. उत्तरार्धात त्या चांगल्या भूमिका करत असत. परंतु, खुशबूने नुकतीच महिलांच्या लैंगिक छळावर महत्वाची आपभीती सांगितली आहे. तिच्या बालपणात लैंगिक शोषणाबाबत तिने खळबळजनक खुलासा केला आहे.
खुशबू सुंदरने सांगितले की, मी ८ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण करत असत. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत माझ्या वडिलांविरुद्ध बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझी आई माझ्या वडिलांना ‘देव’ मानत होती. त्यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला आईला हे सांगायचे होते. पण त्यांना भीती वाटत होती की आई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. लैंगिक छळावर खुशबू सुंदर यांचा वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबईतील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या खुशबूला अभिनयाची लहानपणापासूनच आवड होती. खुशबू तमिळ दिग्दर्शक आणि अभिनेता सी. सुंदर यांच्याशी केली आहे. डीएमकेमध्ये प्रवेश करत २०१० मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पक्षाच्या प्रवक्त्या बनल्या. यानंतर, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२१ ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली. परंतु द्रमुकच्या एन अझिलनकडून त्यांचा पराभव करण्यात आला होता. खुशबू सुंदर यांनी नुकताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याचा पदभार स्वीकारला आहे.