Video : ‘कौन बनेगा करोडपती’मधील स्पर्धकाचा ‘आजार’ समजताच अमिताभ बच्चन झाले भावूक

Video : ‘कौन बनेगा करोडपती’मधील स्पर्धकाचा ‘आजार’ समजताच अमिताभ बच्चन झाले भावूक

Kon Banega Karodpati 16 :  ‘कौन बनेगा करोडपती 16 या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांना एका स्पर्धकाच्या गंभीर आजारा विषयी कळलं. (Kon Banega Karodpati) राजस्थानच्या राहणाऱ्या या स्पर्धकाच्या मदतीला अमिताभ हे धावून आले आहेत. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती 16′ सुरु झाला आहे. त्यातही कोणत्याही स्पर्धकाला यश मिळालेलं नाही. शोमध्ये काही स्पर्धकांना जॅकपॉट लागतो तर काही स्पर्धक हे सुरुवातीलाच खेळातून बाहेर होतात.

Kalki 2898: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल अमिताभ- प्रभास यांचा ‘कल्की 2898 एडी’

27 वर्षांच्या नरेशी मीना ही राजस्थानच्या सवाई माधोपुरची राहणारी आहे. तिनं बिग बींना सांगितलं की, तिला 2018 मध्ये ब्रेन ट्यूमर निदान झालं आणि 2019 मध्ये तिची एक सर्जरी झाली. खरंतर तिचा हा जो ट्यूमर आहे तो अशा ठिकाणी आहे जिथून काढता येणं खूप कठीण आहे. तर, दुसरीकडे तिच्या आईनं तिच्या ऑपरेशनसाठी सगळे दागिने विकले. आता उपचार करण्यासाठी लागणारी रक्कम मिळवण्यासाठी नरेशी ही या शोमध्ये आली आहे. नरेशीनं यावेळी हे देखील सांगितलं की तिला प्रोटॉन थेरेपी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही सगळ्यात महागडी ट्रिटमेंट आहे. ही ट्रिटमेंट करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात.

नरेशीनं तिच्या आजारीविषयी सांगितल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झाले. बिग बीनं प्रोटॉन थेरेपीसाठी लागणारा सगळा खर्च करण्याचं प्रयत्न करणार असल्याचं वचन तिला दिलं. त्यांनी सांगितलं की ‘मला तुझा सहाय्यक व्हायचं आहे, मला तुला पाठिंबा द्यायचा आहे आणि आता तू शोमधून जी काही रक्कम जिंकशील ती तुझी असेल. तुमच्या उपचाराबाबत काहीही चिंता करु नकोस.’

महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना

अमिताभ बच्चन यांनी नरेशीच्या साहसीवृत्तीचे कौतुक केलं आणि म्हणाले, ‘सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्याही गोष्टीवर बोलण्यासाठी महिलेत खूप हिंम्मत असावी लागते. तू जे धैर्य दाखवलंस त्यासाठी मी आभारी आहे. मी तुझ्या या संपूर्ण हिंम्मतीची दाद देतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की तुला या गोष्टीची चिंता असेल की तू किती रक्कम जिंकणार आणि त्याशिवाय तू उपचाराला घेऊन खूप सकारात्मक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या