WhatsApp Pay ला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर Meta ची नवी रणनीती, कुणाल शाह यांच्या नावामागंच नेमकं गणित काय?
व्हाट्सअपच्या नव्या ग्लोबल प्रमुखपदी कुणाल शाह यांची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मोठी चर्चा रंगली आहे.
Kunal Shah entrusted with WhatsApp responsibility : व्हाट्सअपच्या नव्या ग्लोबल प्रमुखपदी कुणाल शाह यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मोडियावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मोठी चर्चा रंगली आहे. कुणी त्यांच्याकडे आयआयटी किंवा आयआयएमची पदवी नसल्याचे सांगत आहे, तर कुणी त्यांच्या कॉलेज ड्रॉपआऊट ते यशस्वी उद्योजक या प्रवासाचे कौतुक करत आहे.
मात्र या संपूर्ण चर्चेत एक महत्वाचा प्रश्न मागे पडताना दिसतोय. प्रश्न हा नाही की कुणाल शाह कोण आहेत, तर मेटा सारखी कंपनी व्हाट्सअपच्या नेतृत्वासाठी त्यांच्याकडे का पाहत आहे? सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांसारखे भारतीय वंशाचे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अभियांत्रिकी आणि तांत्रिक पार्श्वभूमीचे आहेत. त्याउलट कुणाल शाह यांची वाटचाल वेगळी राहिली आहे. त्यामुळे त्यांची निवड का महत्वाची ठरू शकते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यामागील एक मोठे कारण म्हणजे CRED. वरवर पाहता CRED ही एक फिनटेक कंपनी वाटत असली, तरी देशातील सर्वाधिक प्रीमियम ग्राहकवर्ग असलेल्या प्लॅटफॉर्मपैकी ती के मानली जाते. CRED चे वापरकर्ते प्रामुख्याने क्रेडिट कार्ड वापरणारे, वेळेवर बिल भरणारे आणि उच्च खरेदी क्षमता असलेले ग्राहक आहेत. यामुळे CRED हे एक अँप राहिलेलं नाही, तर ग्राहकांच्या खर्चाच्या सवयी, आर्थिक वेतन आणि खरेदीच्या पद्धती समजून घेणारे एक प्रभावी व्यासपीठ बनले आहे. पेमेंट्स, शॉपिंग, विमा, कर्ज तसेच इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहिती या प्लॅटफॉर्मकडे उपलब्ध असते.
दुसरीकडे भारत हा व्हाट्सअपसाठी जगातील सर्वात मोठा बाजार आहे. देशात 50 कोटींहून अधिक वापरकर्ते व्हाट्सअप वापरतात. मात्र एवढा मोठा वापरकर्ता वर्ग असून देखील व्हाट्सअप समोर महसूल वाढवण्याचे मोठे आव्हान कायम राहिले आहे. मेटा ने व्हाट्सअप पे, बिझनेस मेसेजिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून कामे वाढवण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम सारखे यश अद्याप मिळालेले नाही.
ब्रेकिंग : बालविवाहांना लागणार ‘ब्रेक’ आता लग्नपत्रिकेवर लिहावी लागणार वधू-वराची जन्मतारीख
याच ठिकाणी कुणाल शाह यांचे नाव चर्चेत येते, फ्रीचार्ज पासून CRED पर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर ग्राहकांचे आर्थिक वर्तन, खर्चाच्या सॅवियो आणि त्यांनी आकर्षित करणाऱ्या ऑफर्स यांचा सखोल अभ्यास केल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, मेटाला व्हाट्सअपला फक्त चॅटिंग अँप न ठेवता भविष्यात पेमेंट्स, शॉपिंग आणि डिजिटल कॉमर्सचे मेथे केंद्र बनवायचे असल्यास अशाच प्रकारच्या नेतृत्वाची गरज असू शकते
भारतात या बदलाचे महत्व अधिक मोठे ठरू शकते. आज कोट्यवधी भारतीय व्हाट्सअपवर संवाद साधत असतात, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना आणि व्यावसायिक व्यवहार देखील करतात. भविष्यात जर याच प्लॅटफॉर्मवर पेमेंट्स, कर्ज, विमा आणि खरेदीसारख्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या, तर वापरकर्त्याच्या आर्थिक आणि वैयक्तिक माहितीबाबत गोपनीयतेचे प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतात.
म्हणूनच काही तज्ज्ञ या संभाव्य घडामोडीकडे मेटाच्या भारतातील पुढील मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पाहत आहेत. भरात जा आधीच व्हाट्सअपचा सर्वात मोठा बाजार असून डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात देखील झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे व्हाट्सअपने या क्षेत्रात आक्रमक पावले उचलल्यास त्याचा परिणाम संपूर्ण फिनटेक उद्योगावर होऊ शकतो. कुणाल शाह यांची वैयक्तिक यशोगाथा देखील तितकीच प्रेरणादायी अशी आहे. त्यांनी आयआयटी किंवा आयआयएममधून शिक्षण घेतलेले नाही. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली. त्यानंतर एमबीएसाठी प्रवेश घेतला, मात्र उद्योजकतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले.
तथापि, त्यांच्या संभाव्य नियुक्तीची खरी चर्चा त्यांच्या पदवीमुळे नाही, तर त्यांनी गेल्या अनेक वर्षांत ग्राहकांचे आर्थिक व्यवहार, खर्चाच्या सवयी आणि डिजिटल वर्तन समजून घेण्यात मिळवलेल्या अनुभवामुळे आहे. आणि कदाचित याच कारणामुळे मेटासारखी कंपनी भविष्यातील व्हाट्सअपच्या नव्या रूपाची जबाबदारी अशा नेतृत्वाकडे सोपवण्याचा विचार करत असल्याची चर्चा रंगत आहे.