बिहारमध्ये पत्रकाराची हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या, मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरले
Bihar News : बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका स्थानिक पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पहाटेच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी पत्रकाराच्या निवासस्थानी प्रवेश करत हा हल्ला केला आहे. यात विमल कुमार यादव (Vimal Kumar yadav)(वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. पत्रकाराच्या हत्येनंतर बिहारमधील राजकारणही पेटले आहे. कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
विमल कुमार यादव हे दैनिक जागरणचे स्थानिक प्रतिनिधी होते. राणीगंज बाजार परिसरात विमल कुमार यादव यांचे घर आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर त्यांच्या घरी आले. हल्लेखोरांनी घराचा दरवाजा वाजवत विमल कुमार यादव यांचे नाव घेतले. स्वतः विमल कुमार यादव यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर हल्लेखोरांनी यादव यांच्यावर गोळीबार केला. त्यात यादव यांचा मृत्यू झाला आहे.
महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
या घटनेनंतर काहीच वेळात स्थानिक पोलिस घटनास्थळी आले आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अररियाचे पोलीस अधीक्षक यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार ययांनी ही घटना दुःखत असून, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी भावाचा हत्या, विमल कुमार यादव मुख्य साक्षीदार
दोन वर्षांपूर्वी विमल कुमार यांचा लहान भाऊ कुमार शशिभूषण उर्फ गब्बू यांचे हत्या करण्यात आली होती. शशिभूषण हे सरपंच होते. त्यांचीही याच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या घटनेचे विमल कुमार यादव हे मुख्य साक्षीदार होते. त्यांची साक्षही झालेले नाही. त्यापूर्वीच त्यांची हत्या झालेली आहे. त्यांच्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींनीच हे घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. यापूर्वीही विमल कुमार यादव यांना अनेक धमक्या आल्या आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमारांना घेरले
या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना घेरले आहे. बिहारमधील लोकशाही धोक्यात आली आहे. पोलिस, पत्रकारांची हत्या करणारे आरोपी हे मोकाट फिरत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी केला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी नितीश कुमारवर हल्लाबोल करताना बिहारमधील लोकशाही धोक्यात आली आहे. हे सरकार चौथ्या खांबाचे संरक्षण करू शकत नाही, अशी टीका केली आहे.