साहित्य अकादमी अध्यक्षपदी माधव कौशिक, रंगनाथ पठारे यांचा पराभव
नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित संस्था मानली जाणारी साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदी माधव कौशिक (Madhav Kaushik) यांची निवड झाली आहे. आज सकाळी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे (Rangnath Pathare) हे देखील निवडणूक रिंगणात होते. आधीच्या मराठी उमेदवारापेक्षा पठारे यांनी अधिकचा प्रचार देखील केला होता. पण त्यांचा विजय होऊ शकला नाही. कन्नाड साहित्यिक डॉ. व्यंकटेश मल्लापुरम देखील रिंगणात होते.
साहित्य अकादमीची स्थापना 1952 साली झाली होती. परंतु आतापर्यंत या अकादमीचा अध्यक्ष कधीही मराठी लेखक होऊ शकलेला नाही. सलग दुसऱ्यावेळी ही निवडणूक होती. यामध्ये मराठी साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात होते. यापूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना चार मते मिळाली होती. यावेळी रंगनाथ पठारे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण यावेळी माधव कौशिक यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
Virat-Anushka:अनुष्काला भेटल्यानंतर विराटचे आयुष्य कसे बदलले? जाणून घ्या…
माधव कौशिक हे हिंदीतील प्रख्यात साहित्यिक आहेत. सध्या ते साहित्य अकादमीचे उपाध्याक्ष होते. यावेळी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत 97 जणांनी मतदान केले. ही निवड पाच वर्षांसाठी झाली आहे. 2018 ते 2023 या काळात चंद्रशेखर कंबार हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते.
सर्वसाधारण परिषदेमध्ये 24 भाषांतील प्रतिनिधींसह 99 सदस्य आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेकदा दक्षिणेतील साहित्य वर्तुळाचे वर्चस्व राहिले आहे.