Railway Budget 2023 : महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटींचा निधी; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Railway Budget 2023 : महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटींचा निधी; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना रेल्वेसाठी मोठी तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पात (Railway Budget) रेल्वेसाठी २. ४० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. वर्ष २०१३ च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ करण्यात आली. रेल्वे अर्थसंकल्पात राज्याकरिता १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली. यात मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

भुसावळ विभागासाठी १४७०.९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पानंतर रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काही रक्कम, प्रकल्प आले याची उत्सुकता सगळ्यांना लागली असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प आणि इतर कामांसाठी १३ हजार ५३९ कोटींचा निधी दिला. आतापर्यंत हा महाराष्ट्राकरिता सर्वाधिक निधी असल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव (Railway Minister Ashwin Vaishnav) यांनी केला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटीचा निधी महाराष्ट्राला दिला. वर्ष २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रासाठी ११७० कोटींची तरतूद करण्यात आली. या तुलनेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याकरिता यंदा मोठी तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले की, वंदे मेट्रो या वर्षी डिझाइन केली जात आहे. दोन शहरांना जोडण्याचं काम ही ट्रेन करणार आहे. शिवाय या वर्षात हायड्रोजन ट्रेन तयार केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सध्या त्याच्यावर काम सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हायड्रोजन ट्रेन तयार होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube