Arun Gandhi : महात्मा गांधींचे नातू अरूण गांधी यांचं निधन; कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

Arun Gandhi : महात्मा गांधींचे नातू अरूण गांधी यांचं निधन; कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

Mahatma Gandhi Grandson Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. अरुण गांधी यांचे मुलगा तुषार गांधी यांनी आज ट्विट करत ही माहिती दिली. अरूण गांधी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोण आहेत अरूण गांधी?
अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचा दुसरा मुलगा मणिलाल गांधी यांचा मुलगा आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 ला दक्षिण अफ्रीकेतील डरबनमध्ये झाला होता. त्यांचे वडिल मणिलाल दक्षिण अफ्रीकेतील अखबार इंडियन ओपिनियनचे संपादक होते. तर आई याच वृत्तपत्रात पब्लिशर होत्या. अरुण गांधी यांनी त्यानंतर आपले आजोबा महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालण्याचं ठरवलं त्यांनी सामाजिक कार्याकडे आपला मोर्चा वळवला.

अरुण गांधी यांनी काही पुस्तकही लिहीलेले आहे. यामध्ये द गिफ्ट ऑफ एंगर: एंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रॅंडफादर महात्मा गांधी याचा प्रामुख्याने उल्लेख करता येतो. अरुण गांधी हे 1987 मध्ये आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांनी तेथे अनेक वर्ष टेनेसी राज्यातील मेम्फिसमध्या घालवले. तेथे त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स यूनिवर्सिटीमध्ये अहिंसेशी संबंधित एका संस्थेची स्थापना देखील केली होती.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube