Election Commission : ‘मैं भारत हूं, हम भारत के मतदाता हैं’, निवडणूक आयोगाने आणलं नव गाणं

Untitled Design   2023 02 04T135822.094

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (EC) यावर्षीच्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांना अवाहन करणारं एक गाणं लॉन्च केलं आहे. त्यातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

‘मैं भारत हूं, हम भारत के मतदाता हैं’ असे या गाण्याचे बोल आहेत. सुभाष घई फाउंडेशनसोबत हे गाणं तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यावरांनी नागरिकांना मतदान करण्याचे अवाहन केले आहे.

हे गाणं 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितित प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं पहिल्यापासूनचं अनेक प्रसिद्ध मान्यावरांद्वारे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. लाँच झाल्याच्या एका आठवड्यात, गाण्याच्या हिंदी आणि बहुभाषिक आवृत्तीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या चार प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 3.5 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 5.6 लाख इंप्रेशन मिळाले आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags

follow us