Mallikarjun Kharge : उपराष्ट्रपती मशीनने नोटा मोजायचे : खर्गे यांच्या दाव्याने हास्यकल्लोळ

Mallikarjun Kharge : उपराष्ट्रपती मशीनने नोटा मोजायचे : खर्गे यांच्या दाव्याने हास्यकल्लोळ

नवी दिल्ली : सध्या अदानी समूहाबाबत (Adani Group) राष्ट्रपतींच्या (President) अभिभाषणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींबद्दल (Vice President Jagdeep Dhankhar) केलेल्या दाव्याने मोठा हास्यकल्लोळ उडाला.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ”लोकतांत्रिक संस्थांवर हल्ले होत आहेत. उपराष्ट्रपतींना उद्देशून, तुम्ही तर संविधानाचे जाणकार आहात. प्रसिद्ध वकील आहात. तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. इथं सांगू कि नको. पण सांगितल्याने एवढा काही फरक पडत नाही.”

यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ म्हणाले, ‘मला पण बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. सांगितल्या तर बरं होणार नाही.’ यानंतर सभागृहात हश्शा पिकला. यावर खर्गे म्हणाले ”ते नाही बोलणार, तुम्ही सुरुवातीला वकिली करीत होतात तेव्हा पैसे हाताने मोजत होतात. हे तर ठीक आहे ना?” यावर उपराष्ट्रपतींनी सहमती दिली.

‘महाराष्ट्र भूषण’ची घोषणा करताना CMO च्या अकौंटवरून “ब्रेकिंग न्यूज” युजर्स म्हणतात…

खर्गे पुढं म्हणाले, ”यांची वकिली चालायला लागली तेव्हा मशीनने पैसे मोजायला लागले.” यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकला. उपराष्ट्रपतींनी देखील हात जोडले. खर्गे म्हणाले, ”तुम्ही हे सांगितले आहे. खोटे बोलणार नाही” यानंतर उपराष्ट्रपती म्हणाले, ”तुम्ही माझीच जेपीसी बसवाल.” यानंतर सभागृहात पुन्हा हश्शा पिकला. पंतप्रधान नरेंद मोदी आणि पियुष गोयल यांनी या जुगलबंदीचा आनंद घेतला.

खर्गे म्हणाले, ”तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय होतात आणि तुमची मेहनत यामागे होती. तुम्ही केस जिंकून द्याल हा त्यांचा विश्वास होता. यातून लोक तुम्हाला पैसे देत गेले. तेव्हा तुम्हा मॅडमला सांगितले की मशीनने पैसे मौजयला सुरुवात करा.” खर्गेंच्या विधानावर सभागृहात पुन्हा हश्शा पिकला.

अदानी समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. तुम्हाला मान्य करावं लागलं. हा देशद्रोहाचा मुद्दा नाही. देशहिताची गोष्ट आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. जोपर्यत तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत संयुक्त संसदीय समितीची स्थापना करा, अशी मी सातत्याने मागणी करणार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube