Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur Violence) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. काल थाबौल जिल्ह्यातील भाजप (BJP) कार्यालयाला हिंसक जमावाने आग लावली. तसेच राजधानी इंफाळ शहरात भाजपा प्रदेशाध्यक्ष शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. दोन विद्यार्थी बेपत्ता झाल्याने येथे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातूनच राज्यातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनल्याचे सांगण्यात येत आहे.
Manipur Violence : मणिपूर ‘अशांत’च! राज्य सरकारची मोठी घोषणा
यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत येथील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह येथे तळ ठोकून आहेत. विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास वेगाने केला जात आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. राजधानी इंफाळसह अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. काही ठिकाणी गोळीबारही झाला. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या या चकमकीत काही विद्यार्थी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत इंफाळ खोऱ्यात झालेल्या निदर्शनात 50 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार 19 विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवासस्थानाच्या नूतनीकरणप्रकरणी CBI चौकशी सुरू
येथील विविध अतिरेकी गटांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मणिपूर (Manipur) राज्यात नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. यामध्ये राजधानी इंफाळ, लॅम्फेल सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामासांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पट, हिंगांग, लमलाई, इरिलबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम यांचा समावेश आहे. मात्र, राज्यातील 19 पोलीस ठाणे परिसरात शांतता असून अशा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.