मोठी बातमी! वडगावशेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण; वाचा, नक्की काय घडलं?

डगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली.

Pathare

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. यावादाचं रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झालं.

पुण्यातलं छत्रभूज नर्सी स्कूल हादरलं! पालकाकडून शाळेच्या मैदनात जाऊन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण

मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या दरम्यान आमदार पठारे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला असून, त्यानंतर संतप्त नागरिकांकडून आमदारांनाही मारहाण झाल्याची चर्चा सुरु आहे. उद्या लोहगावात रखडलेल्या विकास कामासंदर्भात आंदोलन होते. त्याच्या आयोजनावरूनही हा वाद पेटल्याची चर्चा आहे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर आमदारच जर सुरक्षीत नाहीत तर नागरिकांचं काय होणार अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे

follow us