केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवासस्थानाच्या नूतनीकरणप्रकरणी CBI चौकशी सुरू

  • Written By: Published:
केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवासस्थानाच्या नूतनीकरणप्रकरणी CBI चौकशी सुरू

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली. सीबीआयने केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाप्रकरणी प्राथमिक तपासाचे आदेश दिले. सध्या सीबीआयने (CBI) निवासस्थानाच्या नूतनीकरणात आढळलेल्या आर्थिक अनियमिततेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान 6 फ्लॅग रोड येथे आहे. कोरोनाच्या काळात या घराचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने केला आहे. हे काम करण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला. नूतनीकरणादरम्यान लाखो रुपये किमतीचे पडदे आणि संगमरवरी दगड लावण्यात आल्याचा या पक्षांचा दावा आहे. त्यानंतर आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिलं. या विनंतीवरून सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केला आहे.

NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत 

सीबीआयने दिल्ली सरकारच्या पीडब्ल्यूडीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष काय म्हणाले?

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थान नुतनीकरण घोटाळ्याची सीबीआय चौकशी सुरू झाल्यानं, सीबीआयचं स्वागत केले आहे. अशा बांधकामांसाठी निविदा काढण्याच्या नियमांचे उल्लंघन कोणाच्या सूचनेवरून करण्यात आले, हे या तपासातून लवकरच उघड होईल, तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अशा इमारती कोणाच्या सांगण्यावरून बांधल्या, हेही या तपासातून उघड होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, आम आदमी पक्षाने सीबीआयच्या या कारवाईवर आक्षेप घेतला असून भाजप आपला संपवण्यासाठी सगळ्या यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा दावा केला.

याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मद्य परवाना घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. तर आता मुख्यमंत्री सीबीआयच्या टार्गेवर आल्याननं पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube