Manipur Violence : मणिपुरात शांतता कधी प्रस्थापित होणार? काँग्रेस खासदाराने सांगितलं
Manipur Violence : जोपर्यंत लुटलेले आधुनिक शस्त्रे आणि 6 लाख काडतूसं मिळणार नाही, तोपर्यंत मणिपुरात शांतता प्रस्थापित होणार नसल्याचं मोठं विधान काँग्रेसचे खासदार गौरव गोगाई(Gaurav Gogai) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरुन विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतरही अद्याप मणिपूरातील हिंसाचार थांबल्याचं दिसत नाहीये.
पवारांच्या भेटीमागे अजितदादांच्या CM पदाचे कनेक्शन; भाजपने टाकलेली अट पूर्ण करण्यासाठी धडपड
पुढे बोलताना गोगाई म्हणाले, मणिपुरात 6 लाख काडतूसांसह आधुनिक शस्त्रे लुटण्यात आले. सुरक्षा दलांकडून शस्त्रे आणि काडतूसे लुटण्यात आले, या शस्त्रांचा वापर राज्यात सुरु असलेल्या हिंसाचारासाठी होत आहे. त्यामुळे जोपर्यंत लुटलेले आधुनिक शस्त्रे काडतूसासंह मिळणार नाहीत तोपर्यंत मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित होणार नसल्याचं विधान गोगाई यांनी केलं आहे.
माढ्याचा पुढला खासदार काँग्रेसचाच! काँग्रेस नेत्याच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ
मणिपुरात 3 मेपासून उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हिंसाचारग्रस्त भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू केलं होतं. मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 1700 घरं पेटवून देण्यात आली आहे. यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी शिबिरांमध्ये आश्रय घेतलाय.
हिंसाचारादरम्यान दोन महिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडिओवरुन देशभरातून संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत केंद्र सरकारसह राज्य सरकारल्याचं चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला, पण अद्याप या प्रकरणी तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं नाही.