जागतिक मंदीच्या सावटात मेटाचा सर्वात मोठा ले-ऑफ; एका झटक्यात 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले

सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाने तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 53

Meta’s biggest layoff  : पहाटेचे चार वाजले आहेत, सगळीकडे शांतता आहे आणि तुम्ही गाढ झोपेत आहात. काही तासांनी उठून ऑफिसला जायचंय, दिवसाची धावपळ सुरू होणार आहे आणि अचानक मोबाईलची स्क्रिन चमकते. कंपनीकडून आलेला एक ईमेल. अर्धवट झोपेत तुम्ही तो मेल उघडता आणि काही सेकंदात आयुष्य बदलून जातं. मेलमध्ये लिहिलेलं असतं, Today is your last working day… म्हणजेच आजपासून तुम्ही कंपनीत काम करणार नाही. हा एक ईमेल आणि क्षणात पायाखालची जमीन सरकते.

अशीच परिस्थिती जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाने एकाचवेळी तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँपसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या या कंपनीच्या निर्णयाने संपूर्ण टेक विश्व हादरलं आहे. जागतिक मंदी, वाढती महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा यंसच्या वर्षातील मोठा ले-ऑफ मानला जात आहे.

मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची पद्धत. मताने कर्मचाऱ्यांना थेट पहाटे चार वाजता ईमेल पाठवून नोकरी संपल्याची माहिती दिली. सर्वात आधी सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांच्या मेलबॉक्समध्ये हा मेसेज पोहोचला. अनेक जण झोपेतून उठले आणि काही क्षणांत त्यांची नोकरी गेल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या स्थानिक वेळेनुसार असेल ईमेल पाठवण्यात आले.

पुण्यात टोळीयुद्ध संपेना! वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या…

इतकंच नाही, तर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं सामान घेण्याची देखील परवानगी देण्यात आलेली नाही. कंपनीने सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले, जेणेकरून ऑफिसमध्ये गोंधळ किंवा भावनिक उरक होऊ नये. या ले-ऑफचा सर्वात मोठा फटका इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट टीम्सना बसल्याच सांगितलं जात आहे.

मार्च महिनाअखेरपर्यंत मेटामध्ये जवळपास 80 हजार कर्मचारी कार्यरत होते. मात्र आय कंपनीचा संपूर्ण फोकस कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वर केंद्रित होताना दिसत आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी AI ला सर्वोच्च प्राधान्य दिलं असून कंपनी या वर्षात AI तंत्रज्ञानावर तब्बल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.

मेटाच्या हेड ऑफ पीपल जेनेल गेल यांच्या मते, कंपनीला आता मोठी टीम नकोय, तर कमी लोकांमध्ये अधिक वेगाने आणि थेट काम करणारी टीम हवी आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर कंपन्या आता माणसांपेक्षा मशीन आणि AI वर अधिक पैसा खर्च करत आहेत. आधीच जवळपास ७ हजार कर्मचाऱ्यांना AI प्रोजेक्ट्समध्ये ट्रान्स्फर करण्यात आलं आहे, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे.

दरम्यान, कंपनीवर आणखी गंभीर आरोप देखील होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, मेटा त्यांच्या वैयक्तिक डिव्हाईसचा डेटा गोळा करत आहे. याविरोधात हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या करत कंपनीने ही प्रक्रिया तातडीने थांबवावी अशी मागणी केली आहे. सध्या जगभरातील टेक क्षेत्रात AI मुले मोठे बदल होताना दिसत आहेत. कंपन्या अधिक स्मार्ट आणि ऑटोमेटेड होत असल्या, तरी त्याची किंमत हजारो कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या रूपाने मोजावी लागत आहे. आणि त्यामुळे आता प्रश्न फक्त मेटाचा राहिलेला नाही. तर AI च्या या नव्या युगात माणूस आणि मशीन यांच्या स्पर्धेत शेवटी कोण टिकणार, हा आहे.

follow us