Explainer : मोदींनी फर्स्ट लेडीला दिलेला ग्रीन डायमंड साधासुधा नाही तर…

Explainer : मोदींनी फर्स्ट लेडीला दिलेला ग्रीन डायमंड साधासुधा नाही तर…

Green Diamond : पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा चांगलाच गाजत आहे. मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणजेच जिल बायडेन यांना साडेसात कॅरेटचा ग्रीन डायमंड (Green Diamond) भेट दिला. हा हिरा काश्मिरच्या कलाकारांनी तयार केला आहे. पण, हा हिरा नैसर्गिक नाही तर याला लॅबमध्ये तयार केले गेले आहे. मात्र तरीसुद्धा हा हिरा नैसर्गिक असल्याचेच दिसत आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारचे हिरे तयार करण्यासाठी सधारण एक ते चार आठवडे लागतात. तर हिरा नैसर्गिक पद्धतीने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. भारत या हिऱ्यांची मोठी बाजारपेठ तर आहेच शिवाय आता उत्पादनातही आघाडी घेत आहे. आता आपण हे समजून घेऊ की लॅबमध्ये तयार केलेला आणि नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या हिऱ्यात काय फरक आहे आणि या दोघांत काय समानता आहेत.

AC Cabin : आता ट्रक ड्रायव्हरचं आयुष्यही होणार ‘ठंडा ठंडा कूल कूल’

नैसर्गिक हिऱ्यांना खोदकाम करून काढले जाते. तर ग्रीन डायमंड मात्र लॅबमध्येच तयार केले जातात. एक कॅरेट नैसर्गिक हिरा जवळपास चार लाख रुपये किंमतीचा असतो. तर लॅबमध्ये तयार केलेल्या हिऱ्याची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत आहे. लॅबमध्ये तयार केलेल्या हिऱ्यात नायट्रोजन मिळत नाही. नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या हिऱ्यात नायट्रोजन आढळते.

ग्रीन डायमंड कसा तयार होतो ?

लॅबमध्ये अधिक दबाव आणि उच्च तापमनात हा हिरा तयार केला जातो. कार्बन सीड्सना मायक्रोव्हेव चेंबरमध्ये ठेऊन विकसित केल जाते. उच्च तापमानात गरम करून चमकणारा प्लाज्मा तयार केला जातो. याच प्रक्रियेत काही कण तयार होतात. जे नंतर हिऱ्यात परावर्तित होतात. यानंतर नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणे कटिंग आणि पॉलिशिंग केली जाते. लॅबमध्ये तयार झालेला हिरा कलर, कटिंग आणि डिझाईनमध्ये सारखाच असतो.

पर्यावरणाला त्रास होतो का ? 

ग्रीन डायमंड तयार करताना सौर ऊर्जा किंवा पवन उर्जेचा वापर केला जातो. हिरा तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रति कॅरेट फक्त 0.028 ग्रॅम कार्बन तयार होते. त्यामुळे हा उद्योग पर्यावरणास जास्त हानीकारक नाही असे म्हणता येईल. ग्रीन डायमंड ज्वेलरी उद्योगासह डायमंड, कॉम्प्यूटर चिप, डिफेन्स, उपग्रह आणि 5G नेटवर्कमध्येही याचा वापर केला जात आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रीन डायमंडच्या जागतिक बाजारात भारताचा हिस्सा जवळपास 25.8 टक्के आहे. 2025 पर्यंत ग्रीन डायमंडच्या बजाराची उलाढाल 2025 पर्यंत 50 अब्ज डॉलर आणि 2035 पर्यंत 150 अब्ज डॉलर होईल, असा अंदाज जाणकारांचा आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कट आणि चमकणाऱ्या हिऱ्यांच्या निर्यातीच्या आकडा 14 अब्ज डॉलर होता. 2021-22 मध्ये हा आकडा 13.5 अब्ज डॉलर होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube