मोमोजच्या हव्यासानं सातवीतल्या पोरानं घरातचं मारला 85 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; तज्ज्ञांचं मत काय?

Momos Jewelry looted एका मुलाला मोमोजचं अमिष दाखवत थेट त्याला त्याच्या घरातील लाखोंचे दागिने आणण्यास सांगितले आणि त्याला गंडा घातला आहे.

Momos Jewelry Looted

Momos’ passion comes at a high price! Momos vendors lure a schoolboy and loot jewellery worth Lakhs : अनेकदा घरातील लहान मुलांनी स्वत: साठी काही खरेदी करण्यासाठी घरामध्ये आई-वडिलांना न विचारता घरातून गुपचूप पैसे घेतल्याचं अनेकदा आपण ऐकत असतो. मात्र आता एका मुलाच्या मोमोज खाण्याची सवय त्याला चांगलीच महागात पडली आहे. कारण त्याला मोमोजचं अमिष दाखवत काही तरूणांनी थेट त्याला त्याच्या घरातील लाखोंचे दागिने आणण्यास सांगितले आणि त्याला गंडा घातला आहे.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये एका 7 व्या इयत्तेतील मुलाला तीन तरूणांनी मोमोज खाऊ घालण्याचं अमिष दाखवून फसवलं आहे. हा मुलगा भगवानपूर तिवारी गावातील आहे. त्याचे वडिल विमलेश मिश्र हे वाराणतील एका मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, त्यांच्या मुलाला मोमोज खाण्याची प्रचंड आवड आहे. त्याच्या याच गोष्टीचा फायदा घेत त्याला फसवण्यात आलं आहे.

अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी तब्बल 25 लाखांच्या सोन्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

या फसवणुक करणाऱ्या तीन तरूणांचं देवरिया-कसया मार्गावरील डुमरी येथील चौपाटीवर मोमोजचं दुकान आहे. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या 7 वी तील मुलाला मोमोज खाऊ घातले होते. त्यानंतर त्याला मोमोज खाण्याची सवय झाल्यानंतर त्यांनी थेट घरातील दागिने आणण्यास सांगितले. त्यामुळे या मुलाने या तरूणांना घरातील तब्बल 85 लाख रूपयांचे दागिने नेऊन दिले.

घटना कशी उघडकीस आली?

या 85 लाखांच्या दागिन्यांमध्ये मिश्र यांच्या बहिणीचे काही दागिने होते. ती गावाला गेल्यामुळे तिचे दागिने तिने भावाच्या घरी आणून ठेवले होते. जेव्हा ती गावावरून परतल्यानंतर दागिने घेऊन जाण्यासाठी आली तेव्हा तिजोरीमध्ये दागिने नव्हते तेव्हा ही घटना तेव्हा उघडकीस आली. तिजोरीतील सर्वच्या सर्व दागिने गायब होते. त्यावेळी या मुलाला विचारले असता त्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा…; साथ सोडलेले प्रशांत जगताप पुन्हा दादांसमोर नतमस्तक

त्यानंतर या कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांनी या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मंडळी तुमच्या आसपास देखील अशा प्रकारच्या घटना घडत असतील वेळीच सावध व्हा आणि त्या रोखण्यासाठी प्रयत्न करा.

 

follow us