तब्बल पाच तास पाण्यात अन् श्वास घेण्यासाठी वापरली अनोखी टेक्निक असा पकडला अट्टल चोर…

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एका चोराने चक्क पाच तास पाण्यात राहून पोलिसांना गुंगारा दिला, अखेर पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर चोर पोलिसांच्या हाती लागला.

Untitle (44)

Thief Hides Underwater : चोरीच्या अनेक बातम्या आणि त्यासाठी वापरलेल्या अनेक थरारक क्लृप्त्या आपण नेहमी विविध ठिकाणी ऐकतो. पण आता एक असा चोर समोर आला आहे. ज्याने थोडे ना थोडके चक्क पाच तास पाण्यात राहून पोलिसांना गुंगारा दिला आहे. पण हा चोर पाण्याखाली तब्बल 5 तास कसा राहू शकला. त्याने श्वास घेण्यासाठी एक अनोखी टेक्निक वापरली. ही टेक्निक नेमकी काय? या अट्टल चोराला पोलिसांनी कसं पकडलं? जाणून घेऊ…

अवैध उत्खननावर नियंत्रण…थेट जिल्हाधिकाऱ्यांचीच परवानगी लागणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

ही घटना सोमवारी 6 एप्रिलला पहाटे 4 .50 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्टेशनवर घडली. एक व्यक्ती संशयित रित्या रेल्वेमधून उतरला त्याची रेल्वे पोलीसांनी चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका महिलेची पर्स चोरण्याचा केला होता. मात्र त्याने पळ काढलाच पोलीसांनी पकडण्या आधीच त्याने थेट एका तलावामध्ये उडी घेतली त्याने पोलीसांपासून वाचण्यासाठी एक अशी शक्कल लढवली की, त्याने थेट पाच तास पाण्यात राहून काढले. हे पाहून पोलीसही हैराण झाले.

ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ! 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट; सपकाळांचा घणाघात

मात्र अखेर रेल्वे पोलीसांनी त्याला थेट पानबुडीच्या मदतीने पकडण्याची मोहिम हाती घेतली. बराच वोळ चाललेल्या या शोधमोहिमेनंतर अखेर हा चोर पोलीसांच्या हाती लागला. पण तो बाहेर आल्यानंतर त्याने पाण्यात काढलेल्या पाच तासांबाबत आणि त्याने पाण्यात श्वास घेण्यासाठी वापरलेल्या क्लृप्तीची चर्चा सर्वत्र झाली. कारण यावेळी त्याने श्वास घेण्यासाठी कमळाच्या फुलाची दांडी वापरली. जी पोकळ झालेली होती.

follow us