संतापजनक! भररस्त्यात नेत्याचे महिलेशी खुल्लम खुल्ला सुरू; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर FIR

संतापजनक! भररस्त्यात नेत्याचे महिलेशी खुल्लम खुल्ला सुरू; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर FIR

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नेता दिसून येत आहे. तो दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसत आहे. या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे का हा व्यक्ती मनोहर धाकड आहे. धाकड भाजप नेते असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारानंतर भाजपने धाकड यांच्याशी पक्षाचे कोणतेही संबंध नाहीत असे स्पष्ट केले आहे.

या घटनेती महत्वाची माहिती अशी, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील मंदसौर येथून समोर आला आहे. या व्हिडिओत भाजप नेता मनोहर धाकड दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. मनोहर धाकडची पत्नी मंदसौरमधील बनी गावातील प्रभाग 8 मधून जिल्हा पंचायत सदस्य आहे. 13 मे रोजी रात्रीच्या या व्हिडिओत मनोहर धाकड पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे.

Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

दोन दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका आक्षेपार्ह आहे की आम्ही तो दाखवू शकत नाही आणि त्याबद्दल काही सांगूही शकत नाही. हा व्हिडिओ 21 मे रोजी सोशल मीडियावर अपलोड झाला होता. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात वादळ उठलं आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. यानंतर भाजप बॅकफूटवर ढकलला गेला आहे.

भाजप प्रवक्ते यशपाल सिंह सिसोदिय यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. याबाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मनोहर धाकड बेपत्ता झाला आहे. त्याचा मोबाइलही स्वीच ऑफ येत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर मनोहर धाकडची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या नेत्याला राष्ट्रीय सरचिटणीस पदावरुनही काढून टाकण्यात आले आहे. धाकड महासभेनेही पत्रक काढून या नेत्याला बडतर्फ केलं आहे. भाजप हा अनुशासन असलेला पक्ष आहे. जर कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई होतच असते. मनोहरलाल धाकड हा भाजपाचा प्राथमिक सदस्य सुद्धा नाही असे प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट केल्याचे यशपाल सिंह सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे.

मोठी बातमी! मध्यप्रदेशातील 17 शहरांत दारूबंदी, 1 एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube